शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील उमरेड मार्गावर मिक्सर ट्रकने शिक्षिकेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:02 IST

भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने एका शिक्षिकेला चिरडले. या अपघातात शिक्षिकेचे पती जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजता उमरेड मार्गावरील श्यामबाग चौकाजवळ हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देसंतप्त जमावाकडून दगडफेक, चालकाला झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने एका शिक्षिकेला चिरडले. या अपघातात शिक्षिकेचे पती जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजता उमरेड मार्गावरील श्यामबाग चौकाजवळ हा भीषण अपघात घडला.तुकडोजी पुतळ्याजवळ राहणाऱ्या आशा शत्रुघ्न रोकडे (वय ५०) या त्यांचे पती शत्रुघ्न मोतीरामजी रोकडे (वय ६१) यांच्या मोपेडवर बसून मंगळवारी दुपारी शाळेतून घराकडे जात होत्या. ट्रकचा (एमएच ४०/ एके ५८०१) चालक दिलीप सोमाजी पटले (वय ३०, रा. डोंगरी तुमसर, जि. भंडारा) याने रोकडे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे आशा रोकडे खाली पडल्या. त्यांना आरोपी ट्रकचालक पटलेने चिरडले. वर्दळीच्या मार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने आरोपी पटलेची धुलाई केली. माहिती कळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी जमावाच्या तावडीतून आरोपीला ताब्यात घेतले. रोकडे यांच्या तक्रारीवरून आरोपी पटलेविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू