शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआय मार्कचा दुरुपयोग

By admin | Updated: June 14, 2014 02:58 IST

वस्तूचा दर्जा व सुरक्षितता निश्चित करण्यासाठी मानके वापरली जातात.

नागपूर : वस्तूचा दर्जा व सुरक्षितता निश्चित करण्यासाठी मानके वापरली जातात. वस्तूवर मानके असल्यास ती वस्तू दर्जेदार मानण्यात येते. कारण ही मानके भारत

सरकारच्या भारतीय मानक ब्युरोकडून लावली जातात. त्यालाच आयएसआय मार्क म्हणतात. मात्र, या मानकांचाही गैरवापर उघडपणे होऊ लागला आहे. ‘आयएसआय’

मार्कचा नकली लोगो लावून उत्पादकांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहे. आयएसआय मानकाचा दुरुपयोग करून ग्राहकांना फसवित

असलेल्या विदर्भातील २५ उत्पादकांवर विविध कोर्टात केसेस सुरू आहे.
वस्तूच्या उत्पादन प्रणालीत अनेक ठिकाणी मानकांचा उपयोग करण्यात येतो. ही मानके विविध देशामध्ये त्यांची गरज आणि अभ्यासानुसार, अनुभवातून तयार होतात.

ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित ठरतील अशी उत्पादने बाजारात आली पाहिजेत. त्यासाठी जी व्यवस्था उपलब्ध आहे, जी यंत्रणा कार्यरत आहे, तिचे नाव भारतीय मानक ब्युरो

आहे. केंद्र सरकारने आयएसआय अंतर्गत ९० उत्पादनांचा समावेश केला आहे. आयएसआय मानांकनाशिवाय उत्पादन विकता येत नाही. आयएसआय मानांकनाशिवाय

विक्री करताना जर आढळल्यास, उत्पादनाला जप्त करून, उत्पादकावर ५० हजारापर्यंत दंडात्मक कारवाई व ६ महिन्यांची कैदही होऊ शकते. असे असतानाही भारतीय

मानक ब्युरोक डून कुठलाही परवाना न घेता, आयएसआय मार्क लावून उत्पादनाची विक्री करणारे मोठ्या प्रमाणात आढळतात. ब्युरोचे विदर्भातील मुख्यालय असलेल्या

नागपूर शहर कार्यालयाने गेल्या काही वर्षात सिमेंट, पीव्हीसी पाईप, मोटारपंप, केबल, एलपीजी, थ्रेशर, प्लायवृड व पाणी उत्पादकांवर कारवाया केल्या आहेत.

आयएसआयचा सर्वाधिक दुरुपयोग पाण्याच्या विक्रीत होत आहे. संपूर्ण विदर्भ कार्यक्षेत्र असलेल्या नागपुरातील ब्युरोच्या कार्यालयात केवळ ४ अधिकारी आहे. त्यांनाच

कारवाई करा, परवाना असलेल्या आस्थापनेला भेटी द्या, नोंदणीसाठी अर्ज येणाऱ्या आस्थापनाची संपूर्ण तपासणी करा, प्रत्येक पेशीवर कोर्टात हजर रहा, अशा प्रकारची

भरपूर कामे आहेत. त्यामुळे बनावट आयएसआय मार्क लावून उत्पादनाची विक्री करणाऱ्यावर अंकुश लावणे कठीण जात आहे. विदर्भात भारतीय मानक ब्युरोचा परवाना

मिळविलेले ३८० उत्पादक आहेत. त्यापैकी दरवर्षी २० ते २५ उत्पादकांची मानके रद्द होतात. अधिकृत परवानाधारकाकडे वर्षातून दोन वेळा भेट देण्यात येते. (प्रतिनिधी)