शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर !

By admin | Updated: November 16, 2016 02:40 IST

छत्रपती चौकातील उड्डाण पुलाचे तोडकाम मोठ्या अद्ययावत क्रशर मशीनने मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाले.

अत्यंत सुरक्षेत पूल तोडण्याचे काम : वाहतूक बंदनागपूर : छत्रपती चौकातील उड्डाण पुलाचे तोडकाम मोठ्या अद्ययावत क्रशर मशीनने मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकातील चार पिलरवर उभ्या पुलाचा ६० टक्के भाग तोडण्यात आला. तत्पूर्वी सोमवारी रात्री पुलावरील लोखंडी ग्रील तोडण्यात आले. पूल तोडण्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती. एकूण ४०० मीटर लांब या उड्डाण पुलावर मध्य भागातील चार पिलरवर १३० मीटर बांधकाम आहे. पुलाला पाच टप्प्यात तोडण्यात येणार आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला खोदकाम सुरू करण्यात आले आहे. मोठ्या क्रशर मशीन्सने पुलाची स्लॅब आणि लोखंड तोडण्यात आले. तोडकाम करताना रस्ता पांढऱ्या धुळीने माखला होता. धूळ इतरत्र पसरू नये म्हणून त्यावर मोठ्या स्प्रेने पाणी टाकण्यात येत होते. परिसरात संचारबंदीवाहतूक बंद करून छत्रपती पूल तोडण्याचे काम सुरू होताच परिसरात अघोषित संचारबंदी होती. चौकातून जाणारा मार्ग निर्मनुष्य होता आणि दुकाने बंद होती. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर शांतता पसरली होती. केवळ मशीन्स आणि तोडण्याचा आवाज येत होता. हेल्मेट व मास्क लावण्यावर भरपूल तोडताना मेट्रो रेल्वे व मत्ते असोसिएट्सचे अभियंते काही कामगारांना हेल्मेट आणि मास्क लावण्याचा सल्ला देत होते. धुळीपासून बचाव करणारे मास्क उत्तम गुणवत्तेचे आहेत. धूळ रस्त्यावर ठेवण्यास मदतनीस ठरणारी मशीन काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. स्ट्रक्चरल डिझायनर उपस्थितपूल तोडताना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी स्ट्रक्चरल डिझायनर सज्ज होते. शिवाजीनगर येथील रहिवासी डिझायनर पी. पाटणकर हे पत्नी आणि मुलीसोबत उपस्थित होते. लोखंड वेचणाऱ्या महिलांची गर्दीपूल तोडताना लोखंड गोळा करणाऱ्या महिलांनी मुलांसोबत गर्दी केली होती. लोखंड गोळा करताना त्या मशीन्सकडे गेल्या असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी बाजूला केले.पक्ष्यांनी घरटे सोडलेगेल्या १८ वर्षांपासून पुलाखाली विजेच्या खांबावर काही पक्ष्यांनी घरटे बांधले होते. पूल तोडण्याचे काम सुरू होताच मशीन्सच्या कंपनाने पक्ष्यांचे घरटे तुटले. दुपारी ३ च्या सुमारास एक कबूतर पुलाखालील विजेच्या खांबावर घरटे शोधत होता. काही वेळानंतर तो परत गेला. नागपुरात होणाऱ्या विकास कामात या पक्ष्याचे योगदान असल्याचे दिसून आले. दररोज २० तास तोडकामउड्डाण पूल ३० नोव्हेंबरपर्यंत जमीनदोस्त होणार आहे. दररोज २० तास काम करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश अग्रवालआणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र रामटेककर यांच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम सुरू आहे. निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीच पूल तोडण्याचा प्रयत्न असल्याचे ‘एनएमआरसीएल’चे सहायक अभियंते जयप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.पुलाचे तोडकाम मोबाईलमध्ये कैदउड्डाण पुलाचे तोडकाम अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. चौकातील एका इमारतीवर चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी तोडकामाचे सजीव चित्र रेखाटत होते. चार कलाकारांनी आपापल्या पद्धतीने कागदावर पुलाचे दृश्य चित्रित केले.