शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

नागपूर विद्यापीठात मिश्रा विरुद्ध कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:51 IST

कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्यातील वादाच्या ठिणग्या आणखी तीव्र झाल्या आहेत. एकीकडे मिश्रा यांनी कुलगुरू व त्यांच्या मुलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, तर प्रशासनाने मिश्रा यांचे २३ वर्षे जुने प्रकरण परत चौकशीसाठी बाहेर काढले आहे. सुनील मिश्रा यांनी विद्यापीठाला परत केलेल्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या असा प्रशासनाला संशय असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलीस तक्रार करण्यात येणार आहे. एकूणच हा वाद विद्यापीठाचे राजकारण आणखी तापविणारा ठरणार आहे.

ठळक मुद्देसुनील मिश्रांविरुद्ध पोलीस तक्रार करणार : परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्यातील वादाच्या ठिणग्या आणखी तीव्र झाल्या आहेत. एकीकडे मिश्रा यांनी कुलगुरू व त्यांच्या मुलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, तर प्रशासनाने मिश्रा यांचे २३ वर्षे जुने प्रकरण परत चौकशीसाठी बाहेर काढले आहे. सुनील मिश्रा यांनी विद्यापीठाला परत केलेल्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या असा प्रशासनाला संशय असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलीस तक्रार करण्यात येणार आहे. एकूणच हा वाद विद्यापीठाचे राजकारण आणखी तापविणारा ठरणार आहे.मिश्रा यांनी १९९५ मध्ये ‘एलएलबी’ प्रथम वर्षची परीक्षा दिली होती. ‘लॉ आॅफ टार्ट’ या विषयाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी परीक्षा विभागात अर्ज केला होता. पुढे कोहचाडे प्रकरणात मिश्रा यांची चौकशी झाली. मिश्रा यांना बोगस गुणवाढ प्रकरणी २००७ साली १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाची गुणपत्रिका विद्यापीठाला परत करत असल्याचा अर्ज तत्कालीन कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांना केला होता. १३ नोव्हेंबर २००६ च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते व परीक्षा मंडळाने या तिन्ही गुणपत्रिका परत घेण्याच्या व त्या रद्दबातल ठरवित असल्याचा निर्णय घेतला होता.मात्र या गुणपत्रिकाच ‘बोगस’ असल्याचा विद्यापीठ प्रशासनाला संशय आला. यासंदर्भात चाचपणी करण्यात आली होती व त्याचा अहवाल परीक्षा विभागाकडून मागविण्यात आला होता. या मुद्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.तत्कालीन परीक्षा मंडळाने मिश्रा यांच्या गुणपत्रिका रद्दाबातल करण्यास नियमबाह्य पद्धतीने मान्यता दिली होती. परीक्षा मंडळाला अशा पद्धतीने पदवी किंवा गुणपत्रिका मागे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. तसेच हे संपूर्ण प्रकरण न्यायालयीन असताना मिश्रा यांची गुणपत्रिका ही न्यायालयाच्या ताब्यात होती. असे असतानाही त्यांनी ही गुणपत्रिका विद्यापीठाकडे जमा कशी केली व त्यांच्याकडे बनावट गुणपत्रिका कुठुन आली, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला. यावर परीक्षा मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सखोल चर्चा झाली. कारवाईचे सर्वाधिकार कुलगुरुंना देण्यात आले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सुनील मिश्रा आणि तत्कालीन परीक्षा मंडळ सदस्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देणार असल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले.मिश्रांमुळे मिश्रांचे प्रकरण आले बाहेरसुनील मिश्रा यांच्या गुणपत्रिकेचे प्रकरण हे डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या वाङमय चौर्यकर्म प्रकरणामुळे बाहेर आले, अशी माहिती कुलगुरूंनीच दिली. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ.मिश्रा यांनी पदविका परत करण्यासंदर्भातील अर्ज मांडण्यात आला. या अर्जात अगोदर अशा पद्धतीने प्रदीप राठोड व सुनील मिश्रा यांच्या पदव्या परत घेण्यात आल्याचे नमूद होते. हीच बाब प्रशासनाने पकडली व त्यानंतर या मुद्यावर चौकशी बसविली आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर