शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाकडून वडिलांची हत्या; पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी केली मदत

By योगेश पांडे | Updated: January 20, 2025 17:26 IST

दारूच्या व्यसनाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल : मृतकाच्या पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी केली मदत

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलांच्या दारूच्या व्यसनाला व त्यानंतर होणाऱ्या छळवणूकीला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने वडिलांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याच्या आईने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची मदत केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

मुकेश शंकरराव शेंडे (५७, इंगोलेनगर, हुडकेश्वर) असे मृतकाचे नाव आहे. ते ताराचंद भोंगाडे यांच्या घरी पत्नी उर्मिला व १७ वर्षीय मुलासह भाड्याने राहत होते. त्यांचा एक मुलगा बाहेरगावी नोकरी करतो. शेंडे हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते व त्यांना दारूचे व्यसन होते. त्यातूनच ते पत्नी तसेच मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यांच्या या वागणुकीला दोघेही कंटाळले होते. १९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शेंडे दारू पिऊन घरी गेले व नेहमीप्रमाणे त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते परत दारू पिण्यासाठी बाहेर गेले व रात्री दहा वाजता परतले. नशेत त्यांनी पत्नी व मुलाला परत शिवीगाळ सुरू केली. तेव्हा मायलेक जेवण करत होते. त्यांच्या या वागण्याला अल्पवयीन मुलाने विरोध केला असता शेंडे संतापले. त्यांच्यात भांडण झाले व झटापट सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुलाने शेंडे यांना गादीवरून खाली ढकलले. खाली पडल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त निघायला लागले. आता वडील काय करतील या भितीपोटी अल्पवयीन मुलाने थेट टॉवेल उचलला व गळा आवळत शेंडे यांची हत्या केली. हा प्रकार पाहून शेंडे यांची पत्नी हादरली. मात्र आता मुलाला वाचविणे आवश्यक आहे या विचारातून त्यांनी पुरावा नष्ट करायला त्याची मदत केली. त्यांनी शेंडे यांचा मृतदेह पोत्यात भरला. तसेच घटनास्थळावरील रक्ताचे डाग फिनाईलने पुसले. शेंडे यांचे चुलतभाऊ मंगेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

दहावीत असतानादेखील करायचा कामआरोपी अल्पवयीन मुलगा हा दहावीत शिकतो. तो अभ्यासात चांगला असला तरी घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो सुटीच्या दिवशी कामावर जायचा. उन्हाळ्याच्या सुटीतदेखील तो दुकानांमध्ये काम करून घरखर्चात मदत करत होता. वडील दारूच्या व्यसनापोटी घराकडे दुर्लक्ष करत आहेत हे पाहून तो नेहमी चिडायचा.

नदीत फेकणार होते मृतदेह

हत्येनंतर मायलेकाने शेंडे यांचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरला व तो दोन्ही बाजूंनी शिवला. मृतदेह नदी किंवा नाल्यात फेकण्याचे ठरविले. बंटीने मदतीसाठी एका जवळच्या मित्राला फोन केला. मात्र मित्राने त्याची मदत न करता त्याला पोलिसांत जाऊन सर्व प्रकार कबूल करण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्लावरून मायलेकांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर