शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोटात दुखत असल्याने अल्पवयीन मुलीला दवाखान्यात नेले आणि काही वेळात तिने बाळाला जन्म दिला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 12:27 IST

पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले आणि काही वेळेतच मुलीने एका बाळाला जन्म दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार करून एका नराधमाने तिला गर्भवती बनविले. विशेष म्हणजे, पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले आणि काही वेळेतच मुलीने एका बाळाला जन्म दिला.

या प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यामुळे त्या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. पीडित मुलगी केवळ १५ वर्षांची आहे. ती दहावीपर्यंत शिकली असून, तिचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलीला दोन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. सोमवारी तिच्या पोटात कळा आल्याने तिने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर आईवडिलांनी तिला मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मुलीचे वय अवघे १५ वर्षे असल्याचे कुटुंबीयांनी सांगताच डॉक्टर चक्रावले. ती गर्भवती असून कोणत्याही दिवशी तिची प्रसूती होऊ शकते, असे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मेयो रुग्णालयातून पोलिसांना सोमवारी सायंकाळी माहिती देण्यात आली.आरोपीचे नाव अंधारातहे वृत्त पसरल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुलीची प्रकृती चांगली होण्यासाठी किमान दोन दिवस लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. तिच्याकडूनच आरोपीचे नाव उजेडात येणार आहे. तूर्त पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी