शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
2
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
3
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
4
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
5
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
6
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
7
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
8
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
9
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
10
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
11
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
12
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
13
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
14
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
15
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
16
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
18
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
19
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
20
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 9:44 PM

विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : नात्यातील विश्वासाला काळीमा फासला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील आहे.बाबुराव मोतीराम पंच (५५) असे आरोपीचे नाव असून तो गायत्रीनगर येथील रहिवासी आहे. आरोपीने १५ एप्रिल २०१८ रोजी हे नात्यातील विश्वासाला काळीमा फासणारे कूकृत्य केले. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षांची होती. तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी व अ‍ॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.चोरट्याला कारावाससत्र न्यायालयाने शुक्रवारी नवीननगर येथील चोरटा रोहित बलदेव बावणकर (३०) याला ६ महिने कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला. चेतना दखणे असे फिर्यादीचे नाव आहे. ८ आॅगस्ट २०१७ रोजी आरोपीने चेतना यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न केला होता. तहसीलचे पोलीस हवालदार मारोती काचोरे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयLife Imprisonmentजन्मठेप