शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश

By योगेश पांडे | Updated: May 27, 2025 23:54 IST

२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

योगेश पांडे 

नागपूर : मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागात नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केल्याचा आरोप जोशी यांनी लावला होता. संबंधित प्रकरण हे वर्तमान मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकाळातील नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राठोड यांनाच या प्रकरणाची सविस्तर चौकशीचे निर्देश दिले आहेत.

२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. यादी निश्चित झाल्यावर पाच वर्षांनंतर आठ संबंधित अधिकाऱ्यांचे नाव जलसंपदा विभागातून काढून मृद व जलसंधारण विभागात टाकण्यात आले. यावरच जोशी यांनी आक्षेप घेतला आहे.

या प्रकारामुळे पावणे चारशेच्या जवळपास लोकांच्या आस्थापनेत गडबड झाली. या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली होती. जोशी यांच्या पत्रातील तारखांच्या वेळी माझ्याकडे हे मंत्रीपद नव्हतेच. मी जुलै २०२३ मध्ये मंत्री झालो. हे प्रकरण गंभीर आहे व मुख्यमंत्र्यांनी मलाच या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे संजय राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपा