शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 14:49 IST

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्राला डेटा द्यायचा नव्हता असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नागपूर : ओबीसींचा इम्पिरिकल डेटा असतानाही केंद्राने तो दिला नाही. केंद्र सरकारकडून ओबीसींची कोंडी केली जात आहे. केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

 आम्ही ओबीसींचा डेटा केंद्राकडे मागितला पण केंद्राला डेटा द्यायचा नव्हता, असा आरोप करत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा असतानाही केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा गोळा केला नाही, मग भाजप नेत्यांनी कसली मागणी केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.   

ओबीसी जनगणनेचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात केली. त्यावर हा डेटा सदोष असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. मग, हा डेटा आम्हाला द्या आम्ही दुरुस्त करून घेतो असं म्हटलं. पण केंद्राला आमचा डेटा द्यायचा नव्हता, त्यामुळे आम्ही ओबीसींची जनगणना केली नसल्याचे केंद्राने म्हटले, असे भुजबळ म्हणाले.

आम्हाला केंद्र सरकार तो डेटा देत नाही. आमच्याकडे डेटा नाही असे केंद्र सरकार म्हणत आहे, हे साफ खोट आहे. केंद्र सरकार ओबीसींची कोंडी करत आहे. आमच्या मंत्र्याविरुद्ध खोट्या केसेस सुरू आहेत. राज्य सरकार ओबीसींच्या विरोधात असल्याचे चित्र केंद्राकडून उभं केलं जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षात डेटा गोळा करता आला नाही. आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे, आम्ही डेटा गोळा करण्याबाबचे काम करतो. आम्हाला वेळ देणे गरजेचे असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले.  

टॅग्स :PoliticsराजकारणOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जातीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस