शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

व्याघ्रसंवर्धनावर कोटींचा खर्च, फुलपाखरे मात्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:21 IST

एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही.

ठळक मुद्देफुलपाखरांच्या नशिबी सन्मान नाहीदोघेही ‘शेड्युल वन’मध्ये

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघ, अजगर या प्राण्यांसोबतच ‘चांदवा’ हे फुलपाखरू वन विभागाच्या शेड्यूल वनमध्ये मोडते. या प्रवर्गात मोडणाऱ्या प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि त्यांना जगता यावे यासाठी वन विभागाचे कायदे आहेत. मात्र एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही.‘चांदवा’चा विदर्भातही मोठा वावर आहे. मात्र त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने वन विभागाकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. महाराष्ट्र सरकारने भारतात पहिल्यांदा ‘राणी पाकोळी’ या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून जाहीर करून पुढाकार घेतला. त्यासाठी राखीव उद्यान विकसित करण्यासाठी म्हणावा तसा वेग दिसत नाही. नागपूर आणि चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डनमध्ये फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची योजना असली तरी त्यातही फारशी भर पडलेली नाही. अमरावतीमध्ये २०१३ मध्ये सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले. मात्र अलिकडे त्याची एवढी दूरवस्था झाली की हे कामच आता थांबले आहे.पर्यावरण असंतुलनामुळे ऱ्हासपर्यावरण असंतुलनामुळे फुलपाखरांचा ऱ्हास होत आहे. कोणत्या झाडावर कोणते फुलपाखरू अंडी घालते, हे निसर्गनियमाप्रमाणे ठरले आहे. रस्ता रुंदीकरणासारख्या कामात देशी झाडे तोडल्यावर कडूबदाम, सप्तपर्णी, करंजी आदी झाडे लावली जातात. त्यामुळे जन्मसाखळी तुटते. फुलपाखरांच्या आजवरच्या अध्ययनानुसार आवश्यक झाडे लावली तर ही साखळी वेग धरू शकेल.चीनमध्ये तस्करीफुलपाखरांना पकडून त्यांची आसाममधून चीनला तस्करी होत असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला आहे. तिथे फुलपाखरांचे पारदर्शी कि-चेन तयार केले जाते. त्यासाठी लक्षावधी फुलपाखरे मारली जातात. जाळी लावून फुलपाखरे पकडली जातात. मात्र कुणावरही कारवाई होत नाही.फुलपाखरांसाठी राज्याचा अ‍ॅक्शन प्लॅन नाही. कायदा, वनसंवर्धन आणि फुलपाखरू यांचा मेळ अद्याप बसलेला दिसत नाही. त्यांना कायद्याचे योग्य ते संरक्षण मिळायला हवे.- यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळभारतात १,५०३ फुलपाखरेजगात १७,८२१ इतकी फुलपाखरे असून अलिकडच्या आकडेवारीनुसार भारतात १,५०३ फुलपाखरे आहेत तर महाराष्ट्रात २७७ फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. विदर्भात १८७ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात. मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती सहज आढळतात.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव