-तर लाखो नागपूरकर होतील बाधित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:48 AM2020-03-17T10:48:31+5:302020-03-17T10:50:53+5:30

शहरातील दीड ते दोन लाख लहान-मोठे व्यापारी रोज ४० लाखांवर लोकांच्या संपर्कात असतात. या लाखोंच्या गर्दीकडे लक्ष दिले नाही तर नागपुरातील कोरोना थ्री फेजमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.

millions may be affected in Nagpur! | -तर लाखो नागपूरकर होतील बाधित!

-तर लाखो नागपूरकर होतील बाधित!

Next
ठळक मुद्देस्वत:ची काळजी स्वत:च घ्या !एसटी वाहक-चालक, ऑटो चालक, व्यावसायिक विना मास्क-सॅनिटायझरनेगर्दीत राबणाऱ्या माणसाच्या आरोग्याचाप्रशासनाला विसर, विशेष काळजी घेण्याची गरज

गोपालकृष्ण मांडवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातून एसटी महामंडळाच्या रोज साडेतीन हजार फेऱ्या सुटतात. सरासरी दीड ते पावणेदोन लाख नागरिक प्रवास करतात. महानगरपालिकेंतर्गत परिवहनच्या ३६५ बसेसमधून १४० फेऱ्या मिळून हजारो नागरिक दैनंदिन प्रवास करतात. शहरातून रोज २२ हजार ऑटो किमान १० फेऱ्या मारतात. यातून सरासरी साडेआठ लाखांवर नागरिक प्रवास करतात. ८०० ओला उबरच्या दररोज सरासरी ६ फेऱ्या गृहित धरल्या तरी रोज ४२ हजार फेऱ्यांतून त्यापेक्षा अधिक व्यक्ती यातून प्रवासाला असतात. शहरातील दीड ते दोन लाख लहान-मोठे व्यापारी रोज ४० लाखांवर लोकांच्या संपर्कात असतात. असे असले तरी दैनंदिन व्यवहारात माणसाच्या सेवेसाठी राबणारी ही यंत्रणा आज तरी मात्र भरगर्दीत मास्क आणि सॅनिटायझरिंगशिवायच काम करीत आहे. शहरात सुदैवाने स्वच्छतेवर अधिक भर दिला जात असल्याने आणि आरोग्य यंत्रणा सतर्कपणे काम करीत असल्याने कोरोनाचा शिरकाव वाढलेला नाही. मात्र सावधान! या लाखोंच्या गर्दीकडे लक्ष दिले नाही तर नागपुरातील कोरोना थ्री फेजमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.
कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून उपाययोजना व मार्गदर्शनही केले जात असले तरी, गर्दीमध्ये काम करणारी यंत्रणा मात्र आजही दुर्लक्षित आहे. प्रवासी सेवा देणारे वाहक-चालक, व्यावसायिक सेवा देणारे व्यापारी व विक्रे ते यासारख्या घटकांकडे म्हणावे तसे आजही लक्ष नाही. त्यांचे सॅनिटायझरिंग झाले नाही तर त्यामुळे दररोज लाखो लोकांच्या संपर्कात येणारी ही यंत्रणाच उद्या कोरोनाचे वाहक (कॅरियर) ठरण्याचा धोका आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर डेपोमधून दररोज तीन हजार ते साडेतीन हजार बसच्या फेऱ्या धावतात. ११०० चालक आणि ९०० वाहक असे मिळून दोन हजार कर्मचारी थेट प्रवासी सेवेत असतात. त्यांचा लाखो लोकांशी संपर्क येतो. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने १३ मार्चला पत्र काढून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले. मात्र वाहक-चालकांसाठी मास्क अथवा सॅनिटायझर उपलब्ध करून दिलेले नव्हते. काही कर्मचारी स्वत:हून मास्कचा वापर करीत आहेत. बसेस सॅनिटाझरिंग झालेल्या नाहीत. आता १६ मार्चला आदेश पोहचला असून, यापुढे बसचे सॅनिटरायफेन आणि मास्क वाटप होणार आहे.

Web Title: millions may be affected in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.