शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दूध क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 21:59 IST

दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देमदर डेअरी ऑरेंज मावा बर्फीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात दुधाची अर्थव्यवस्था विकसित नाही. मार्केटिंग व्यवस्थेच्या माध्यमातून विदर्भात २५ लाख टन उत्पादन निश्चित केले आहे. या दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.मदर डेअरीच्या ऑरेंज मावा बर्फीच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी मेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनवर मदर डेअरीच्या बूथचे रिमोटने उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्री गिरीराज सिंग, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी, महाव्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर उपस्थित होते.गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी शेतीत उत्पादन आणि पूरक उद्योग वाढावेत. दूध उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादन वाढले तर प्रक्रिया करून विकले गेले पाहिजे. यावर मदर डेअरी चांगले काम करीत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, ही त्यामागील भावना आहे. मदर डेअरीमुळे दूधाचे उत्पादन वाढले आहे. दुधावर आधारित उत्पादनाच्या विक्रीसाठी मदर डेअरीने जो विकेल त्यांना बूथ द्यावे. विदर्भात ८४ सेंटर असून त्यापैकी नागपुरात ५५ आहेत. चांगल्या उत्पादनासाठी मार्केटिंगची गरज नाही. ऑरेंज बर्फी देशात प्रसिद्ध होईल, असा विश्वास आहे. गाईचे दूध आणि मधापासून वर्धा येथे तयार होणाऱ्या गोरस बिस्किटचे उत्पादन मदर डेअरीने मोठ्या प्रमाणात करावे, असे गडकरी यांनी सांगितले.

‘अ‍ॅग्री विथ लाईव्ह स्टॉक’ हाच मूलमंत्र : गिरीराज सिंग शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी विदर्भाचा उल्लेख होतो, तेव्हा वाईट वाटते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. माझ्या मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन मूल्यवर्धित व्हावे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद राहील, तेव्हाच देश अर्थव्यवस्थेत पुढे जाईल. विभागातर्फे जास्त दूध देणाऱ्या गाई तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढले. मदर डेअरीमुळे शेतकऱ्यांकडून दुधाचे संकलन वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी पुरक व्यवसाय करावा. ‘अ‍ॅग्री विथ लाईव्ह स्टॉक’ माझा मूलमंत्र असल्याचे गिरीराज सिंग म्हणाले.दिलीप रथ म्हणाले, मदर डेअरीतर्फे नागपुरातून १२०० मेट्रिक टन संत्री खरेदी केली. यावर्षी ७६० टन खरेदी करून दिल्लीत नेणार आहे. नागपुरातील मदर डेअरीमध्ये १० जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांकडून २ लाख लिटर दूध संकलित करण्यात येते. त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येते. आतापर्यंत शेतकऱ्यांना बँकेद्वारे ४७० कोटी रुपये दिले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याmilkदूध