शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या माध्यमातून विदर्भ-मराठवाड्यात क्रांती, जीवनमानात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 05:17 IST

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबीए) आणि सहायक मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबीए) आणि सहायक मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे १० जिल्ह्यांमधील लोकांच्या जीवनात बदल घडून येत असल्याचे दिसून आले आहे. तेव्हा विदर्भ व मराठवाड्यात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा विश्वास राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांनी आजवरच्या प्रगतीवरही समाधान व्यक्त केले.दिलीप रथ यांनी सांगितले की, एके काळी सरकार दुभती जनावरे विकत घेण्यासाठी अनुदान देत होते, परंतु आता कुठल्याही अनुदानाशिवाय या १० जिल्ह्यातील तब्बल ८ हजारांवर शेतकऱ्यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जनावरे विकत घेतली आहेत. दुधामुळे त्यांना लाभ दिसून येत आहे. सध्या विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, यवतमाळ व मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, लातूर इत्यादींचा समावेश आहे. २०१६-१७ मध्ये कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ४० हजार लीटर दूध संकलन करण्यात आले. २०१७-१८ मध्ये १ लाख ८० हजार लीटर आणि २०१८-१९ मध्ये २ लाख ८२ हजार ८७९ लीटर दूध एकत्रित करण्यात आले आहे. या वर्षी ३ लाख लीटर दूध संकलनाचे लक्ष्य आहे. ७ मार्च, २०१९ पर्यंत २३,७२७ दूध उत्पादक असून, २,२०८ गावांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. १,१९० दूध संकलन केंद्रे आहेत. यात २९ टक्के महिलांची संख्या आहे, हे विशेष. ३१ मे, २०१९ पर्यंत दूध उत्पादकांना ४२७.५१ कोटी रुपये भरणा दिला गेला आहे. प्रत्येक महिन्यात जवळपास २१.६५ कोटी रुपये सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. सध्या नागपुरात दररोज १३,३३९ लीटर दूध दररोज विकले जात आहे.

टॅग्स :milkदूधVidarbhaविदर्भ