शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:14 IST

महापालिका शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आर्थिक स्थिती शिक्षण घेण्याजोगी नाही असे विद्यार्थी तसेच महापालिकेच्या माजी विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिके च्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सैनिक प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानांतर्गत आयोजन : सैन्यात भरती होण्याला मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आर्थिक स्थिती शिक्षण घेण्याजोगी नाही असे विद्यार्थी तसेच महापालिकेच्या माजी विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिके च्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सैनिक प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जुना सुभेदार ले-आऊ ट येथील महापालिकेच्या दुर्गानगर माध्यमिक शाळेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर २० एप्रिलपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून, २० मेपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. कर्नल विशाल शर्मा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. माजी सैनिक संघटना व मनपाची एनडीएस चमू यासाठी सहकार्य करीत आहे. पहिल्या टप्प्यात महापालिक ा शाळांतील १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा महापालिकेचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.महापालिकेतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विचारात घेता, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यसाठी सायकली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी लागणारा गणवेश, बूट व कॅप मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. महापालिका प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवीत आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.प्रशिक्षणासाठी १६ वर्षांवरील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करून उंची, वजन व शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली आहे. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना सैनिक भरतीसंदर्भात माहिती उपलब्ध केली जाईल. प्रशिक्षणामुळे भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचा विश्वास राम जोशी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा