शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 21:48 IST

महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला.तक्रारकर्त्या ग्राहकांनी प्रत्येकी ४५ लाख रुपयामध्ये सुभाष रोडवरील म्हाडा सिटी प्रकल्पातील फ्लॅटस् खरेदी केले आहेत. म्हाडाने ३२० ग्राहकांकडून १२८ कोटी रुपये घेतले आहेत. १५ डिसेंबर २०१२ पर्यंत फ्लॅटस्चा ताबा देण्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु, ती ग्वाही अद्याप पाळण्यात आली नाही. या योजनेचे कंत्राट आयव्हीआरसीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. या कंपनीला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३० जून २०१३, ३१ डिसेंबर २०१३, ३० एप्रिल २०१४ व ३१ नोव्हेंबर २०१४ अशी चारदा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, कंपनीने अद्याप प्रकल्प पूर्ण केला नाही. तसेच, म्हाडाला प्रकल्प पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी, अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक मान्यताही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली आहे. ग्राहकांच्या वतीने अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :mhadaम्हाडाconsumerग्राहक