शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गुजरात ते नेपाळपर्यंत गुंजणार ‘बेटी बचाओ’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:10 IST

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या प्रवासादरम्यान वृक्षारोपणाचा संकल्पही तिने केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने पाच हजार झाडे लावली असून १० हजार झाडे लावण्याचा तिचा प्रयत्न आहे. हरियाणा येथील रेवाडी जिल्ह्यातील छोट्याशा गुर्जर माजरी गावांतील सुनिता चोकन आपल्या ४५ दिवसांच्या सायकल यात्रेवर आहे. मध्य प्रदेश मार्गाने मंगळवारी ती नागपुरात पोहचली. रोटरी क्लबच्या मदतीने तिने पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देसुनिता चोकन हिचा सायकल प्रवास : ४५ दिवसात सर करणार नेपाळ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या प्रवासादरम्यान वृक्षारोपणाचा संकल्पही तिने केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने पाच हजार झाडे लावली असून १० हजार झाडे लावण्याचा तिचा प्रयत्न आहे.हरियाणा येथील रेवाडी जिल्ह्यातील छोट्याशा गुर्जर माजरी गावांतील सुनिता चोकन आपल्या ४५ दिवसांच्या सायकल यात्रेवर आहे. मध्य प्रदेश मार्गाने मंगळवारी ती नागपुरात पोहचली. रोटरी क्लबच्या मदतीने तिने पत्रकारांशी संवाद साधला.सुनिता म्हणाली, ‘रोटरी क्लब रेवरी मेन अ‍ॅण्ड डिस्ट्रीक्ट ३०११’ मदतीने १५ जुलै रोजी गुजरात येथील सोमनाथ मंदिर येथून सोलो सायकल प्रवासाला सुरुवात केली. सिक्कीम होत नेपाळला पोहचणार आहे. पहाटे ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रोज १५० किलोमीटर सायकल चालविते. सायंकाळ होताच जवळच्या गावात आश्रय घेते. मंगळवारी मध्य प्रदेशहून नागपुरात पोहचली. पुढे रायपूर होत पुढील मार्गक्रमण करणार आहे. २०११ मध्ये माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. गंगोत्री हिमालय क्षेत्रात ५२ पर्वत शिखर आहेत. हे सर्व शिखर गिर्यारोहकांनी सर केले आहेत. शिखराचे नावही गिर्यारोहक व स्थानिक लोकांनी दिले आहेत. परंतु गंगोत्री हिमालयात काही शिखर असे आहेत ज्यांची उंची सहा हजार मीटरपेक्षा जास्त आहे. हे शिखर सर न झाल्याने त्याला नाव देण्यात आलेले नाहीत. यातील दोन पर्वत शिखराचे नामकरण नुकतेच मी केले. ६००९ मीटर उंच शिखराला ‘आई’ तर ६०२० मीटर उंच शिखराला ‘मुलगी’ हे नाव दिले आहे. गिर्यारोहक असल्याने निसर्गाशी माझा जवळचा संबंध आहे. यामुळे पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत आहे. प्रवासादरम्यान शाळा-महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपणही करीत आहे. या प्रवास दरम्यान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषवाक्याला घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ती म्हणाली. पत्रपरिषदेला रोटरी क्लबचे अध्यक्ष पाहरी, ललित जैन, निवेदिता पेंढारकर उपस्थित होत्या.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबnagpurनागपूर