शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विलिनीकरण : नासुप्र कर्मचाऱ्यांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:52 IST

नागपूर शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)चे महापालिकेत विलिनीकरण करून नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.परंतु कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, आस्थापना, पेन्शनची जबाबदारी अशा अनेक प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळे नासुप्र कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे.

ठळक मुद्देएनएमआरडीएच्या आकृतिबंधाला अद्याप मंजुरी नाही: पदोन्नती, पेन्शनचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)चे महापालिकेत विलिनीकरण करून नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले. परंतु कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, आस्थापना, पेन्शनची जबाबदारी अशा अनेक प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळे नासुप्र कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे.नासुप्रमध्ये ४२२ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यातील १२० कर्मचारी पुढील दोन वर्षात सेवानिवृत्त होत आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यात सामावून घेतले जाणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व पदांचा विचार करता नासुप्र कर्मचारी महापालिकेत येण्यास इच्छूक नाही. एनएमआरडीएमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु एनएमआरडीएच्या आकृतिबंधाला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही.एनएमआरडीएचा ३५९ पदांचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. परंतु शासनाने १६१ पदांनाच मंजुरी दिली आहे. सध्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचारी येथे कार्यरत आहेत. आकृतिबंध मंजूर असता तर ३५९ कर्मचारी एनएमआरडीएमध्ये समायोजित झाले असते. पदांना मंजुरी नसल्याने इच्छा असूनही नासुप्रच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना एनएमआरडीमध्ये जाता येणार नाही. यामुळे कर्मचारी संभ्रमात आहेत.पदे नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्ननासुप्रत मंजूर असलेली अनेक पदे महापालिका वा एनएमआरडीमध्ये नाहीत. अशा कर्मचाºयांचे समायोजन कुु ठे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. समायोजन करताना कर्मचाऱ्यांचे संमतीपत्र घेणे अपेक्षित आहे. परंतु अद्याप अशा स्वरुपाची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत व्यथा कुणाकडे मांडावी असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.पेन्शनची जबाबदारी मनपावर ?नासुप्र बरखास्तीनंतर कर्मचारी महापालिकेत समायोजित करण्यात आल्यास या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची जबाबदारी महापालिकेला स्वीकारावी लागणार आहे. पुढील दोन वर्षात नासुप्रतील १२० कर्मचारी व अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या पेन्शनचा भार महापालिकेला उचलावा लागणार आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता हा भार कसा उचलणार असा प्रश्न आहे.विकास शुल्कातून सुटका होणार का?अनधिकृत ले-आऊ टमधील भूखंड नियमित करताना नासुप्रकडून आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्काची रक्कम मोठी होती. यामुळे नासुप्रविषयी नागरिकांत रोष होता. नासुप्र बरखास्त झाल्याने महापालिका आता अशा अनधिकृत ले-आऊ टमधील भूखंड नियमितीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कातून सुटका होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. असे झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासEmployeeकर्मचारी