शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यातील व्यापारी संतप्त : मतमोजणीमुळे बाजारात छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:40 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे२१ ते २४ मेपर्यंत बाजारपेठा पूर्णत: बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या या बाजाराऐवजी प्रशासनाने मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये मतमोजणी करावी, अशी मागणी व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना केली.चार दिवस बाजार बंदमतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणाने बाजार समितीला पत्र पाठवून चार दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार बाजार समितीने सर्व बाजाराच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून २१ मेच्या दुपारी ४ वाजेपासून २४ मेपर्यंत बाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, अडतिये आणि ग्राहकांना बाजारात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बाजारात चार दिवसांत मालाची आवक बंद राहील. त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय होणार नाही.भाज्यांची आवक बंद राहणारकळमन्यात सहा मोठ्या बाजारपेठा आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाज्यांचा पुरवठा करणारा भाजीबाजार बंद राहिल्यामुळे शहरात भाज्यांचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच आंब्याच्या सीझनमध्ये बाजारात माल येणार नाही; शिवाय कांदे-बटाटे, लसूण, अद्रक आदींची आवकही होणार नाही. त्यामुळे चार दिवस ग्राहकांना या शेतकी मालापासून वंचित राहावे लागेल. तसेच धान्यबाजारही बंद राहणार असल्यामुळे शेतकरी धान्य आणणार नाही. त्यामुळे दररोज होणाऱ्या मालाचे लिलाव बंद राहतील. तपत्या उन्हामुळे अडतिये आणि व्यापाऱ्यांना बाजारात उपलब्ध फळांचा स्टॉक कमी भावात विकावा लागणार आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.मतमोजणी कळमन्यात करू नयेलोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात करू नये, याकरिता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विविध बाजारपेठांमधील पदाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र लिहिले होते. मतमोजणी मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी केली केली होती. पण शासनाने दुर्लक्ष केले. गेल्या मतमोजणीच्या वेळी बाजार दोन दिवस बंद होता, पण यंदा चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे.आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,कळमना फळे बाजार अडतिया असोसिएशन.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpurनागपूर