कारचे अनेक देशांमध्ये प्रदर्शन : तांत्रिकदृष्ट्या बेजोडनागपूर : मर्सिडीज बेन्जचे अधिकृत विक्रेते ‘आॅटो हँगर’च्या हिंगणा, एमआयडीसी येथील शोरूममध्ये मर्सिडीज बेन्ज जीएलए (ग्रेट ओव्हरलोड अॅडव्हेंचर वर्ल्ड टूर व्हेईकल) कार दाखल करण्यात आली. या कारने आतापर्यंत सर्व सहा खंडाचा टप्पा पार केला आहे. कारचा प्रवास मर्सिडीज बेन्ज इंडियाच्या पुणे येथील उत्पादन कारखान्यातून सुरू झाला. येथे दोन कारची निर्मिती करण्यात आली. एनडीटीव्ही, ईव्हीओ इंडिया आणि आॅटोक्सच्या पत्रकारांनी भारतात निर्मित या कारने जगाचा प्रवास केला. कार प्रारंभी पुणे येथून मुंबईला नेण्यात आली. त्यानंतर इस्तम्बुल (टर्की) येथे नेली. युरोपमध्येही कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कारने युरोपियन देशातील हंगेरी, आॅस्ट्रिया, जर्मनी, लक्जेम्बर्ग, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, इंग्लंड आणि स्पेनचा प्रवास केला. ही कार स्पेन देशातून अफ्रिकेतील मोरक्को देशात आणि तेथून पश्चिमी सहारा आणि मॉरिटोना येथे नेण्यात आली. कासाब्लॅन्का येथे चमूने या कारने प्रवास केला. जीएलए कार येथून अमेरिका येथे पाठविण्यात आली. न्यूयॉर्क येथून कारचा प्रवास सुरू झाला. चमूने जीएलएने अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंत प्रवास केला. त्यानंतर मेक्सिको येथे पदार्पण केले. गुआटामाला आणि पनामा इथंपर्यंत प्रवास करताना दक्षिण अफ्रिकेच्या इक्वाडोरपर्यंत कार नेण्यात आली. आॅस्ट्रेलियाचा प्रवास केल्यानंतर जीएलएला सिंगापूर, मलेशिया, थायलँड आणि म्यानमार या देशांमध्ये कारचे प्रदर्शन करण्यात आले. कारने ६ खंड आणि २८ देशांमध्ये ५० हजार कि़मी.चा पल्ला गाठला. जीएलए कार तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम आणि दमदार आहे. नवीन कार आता मर्सिडीज बेन्जचे अधिकृत विक्रेते आॅटो हँगर शोरूम येथे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहे. (वा.प्र.)
‘आॅटो हँगर’मध्ये मर्सिडीज बेन्झ जीएलए
By admin | Updated: November 12, 2016 03:06 IST