लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णाने रविवारी विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मनोरुग्णाचा आत्महत्येचे कारण त्याला असलेला आजार असे सांगितले जात आहे.प्रशांत मनोहर साकोळे, (३०), रा. महाल असे मृताचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, १९ मार्च २०१९ रोजी प्रशांतला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशांत ‘स्किजोफ्रेनिया’चा रुग्ण असल्याने त्याला आपण काय खात आहे याचे भान राहत नव्हते. रविवारी अचानक त्याने सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास बाथरुममध्ये ठेवलेले फिनाईल प्राशन केले. एका कर्मचाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष जातच डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉ. शाह यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. परंतु प्रकृती ढासळत असल्याचे पाहून त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये दाखल केले. मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यूला त्याचा आजार कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
नागपुरात मनोरुग्णाची विष घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:49 IST
प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णाने रविवारी विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नागपुरात मनोरुग्णाची विष घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालयात खळबळ