शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 20:09 IST

सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात, नागपुरात साडेसहा तास व त्यापेक्षा जास्त मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. यावरून शहरात सुमारे ५० हजार ते एक लाख लोक या व्यसनात आकंठ बुडाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, यातील बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचे ध्यानीमनीही नाही. यामुळे ते आणखी धोकादायक ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनागपुरात सुमारे ५० हजारावर रुग्ण : मेयोच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे सर्वेक्षणजागतिक मानसिक आरोग्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात, नागपुरात साडेसहा तास व त्यापेक्षा जास्त मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. यावरून शहरात सुमारे ५० हजार ते एक लाख लोक या व्यसनात आकंठ बुडाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, यातील बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचे ध्यानीमनीही नाही. यामुळे ते आणखी धोकादायक ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञाचे म्हणणे आहे.मोबाईलच्या गरजेचे रूपांतर व्यसनात होऊ लागले आहे. लहानांना त्याची सवय तर तरुण पिढीवर त्याचे थेट दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मेयोच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, भारतात सुमारे ८० कोटी लोकांकडे मोबाईल तर यातील ३५ कोटी लोकांकडे स्मार्ट मोबाईल आहेत. मनोविकारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मोबाईलचा अतिवापर हे एक कारण प्रकर्षाने दिसून येत आहे. मेयो रुग्णलायाच्यावतीने मोबाईलच्या अतिवापराला घेऊन एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १८ ते २० वयोगटातील १०० मुलांवर नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात सर्वच मुलांनी दिवसाच्या साडेसहापेक्षा जास्त तास मोबाईलवर घालवित असल्याचे तर काहींनी १२ ते १४ तास वापर करीत असल्याचे सांगितले.या प्रश्नांची उत्तरे हो, असेल तर व्यसनतुम्ही तुमच्या झोपेच्या वेळीही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत असाल, घरातील किंवा कार्यालयातील लोक तुमच्या मोबाईलच्या वापराला घेऊन चिडत असतील, मोबाईलचा वापर लपविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असाल, मोबाईल सोडून दुसºया कुठल्याही कामात मन लागत नसेल तर तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे, असा त्याचा समज असल्याचे डॉ. सोमानी यांनी सांगितले.मोबाईल आजाराची लक्षणेमोबाईलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे, मोबाईल वाजल्याचा सतत भास होणे, मोबाईल हातात नसताना बोटाच्या हालचाली होणे, मोबाईल जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येणे ही मोबाईलच्या आजाराची लक्षणे आहे. यातून पुढे छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ शकते.

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्य