शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष नसबंदीकडे वाढतोय कल : लाभार्थ्याला मिळतात १४५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:06 IST

आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पुरुष नसबंदी (एनएसव्ही) प्रशिक्षण व शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिबिरात गेल्या दोन आठवड्यात ४३ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन मिनिटांची ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. राज्य शासनाकडून लाभार्थ्यास ११०० रुपये तर केंद्र शासनाकडून ३५० असे एकूण १४५० रुपये लाभार्थ्यास प्रोत्साहनपर दिले जात असल्याने नसबंदीकडे पुरुषांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देविना टाक्याची दोन मिनिटांची शस्त्रक्रिया

 लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पुरुष नसबंदी (एनएसव्ही) प्रशिक्षण व शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिबिरात गेल्या दोन आठवड्यात ४३ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन मिनिटांची ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. राज्य शासनाकडून लाभार्थ्यास ११०० रुपये तर केंद्र शासनाकडून ३५० असे एकूण १४५० रुपये लाभार्थ्यास प्रोत्साहनपर दिले जात असल्याने नसबंदीकडे पुरुषांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.कन्हान येथे आयोजित ‘एनएसव्ही’ शिबिरात नरखेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी नुकतीच आठ पुरुष रुग्णांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली. दरम्यान, डॉ. गायकवाड यांनी भिवापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण राऊत व सिर्सीचे डॉ. स्वप्निल डडमल यांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले. १८ फेबु्रवारी रोजी रामटेक तालुक्यातील मनसर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १८ पुरुषांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. रामटेकचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, डॉ. संदीप धरमठोक, मनसरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम चौधरी आदींसह आरोग्यसेवक व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. २० फेबु्रवारी रोजी कुही तालुक्यातील तितूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. डॉ. गायकवाड यांनी २५ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली. यावेळी कुही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम व तितूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिलानी उपस्थित होते. आज २१ फेबु्रवारी रोजी मकरधोकडा व २७ फेबु्रवारी रोजी रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबिर होणार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य