शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महा मेट्रो नागपूर व एनएचएआयमध्ये सामंजस्य करार

By आनंद डेकाटे | Updated: June 27, 2025 17:54 IST

Nagpur : जामठा ते बुटीबोरी व एच.बी. टाउन ते ट्रान्सपोर्ट नगर रस्त्यावर कामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय)) आणि महा मेट्रो नागपूर यांच्यात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ४४ आणि क्रमांक ५३ वर मेट्रो व्हायाडक्टचे बांधकाम करण्यात येणार आहेहा करार नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयात करण्यात आला. यावेळी एनएचएआयचे मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी राकेश प्रकाश सिंग, महामेट्रोचे कार्यकारी संचालक नरेश गुरबानी आणि आर. अरुण कुमार उपस्थित होते. या करारामुळे महा मेट्रोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आणि ५३ वर जामठा ते बुटीबोरी (एनएच -४४) आणि एच.बी. टाउन ते ट्रान्सपोर्ट नगर (एनएच-५३) — या दोन महत्त्वाच्या मार्गांवर एनएचएआयIच्या 'राईट ऑफ वे' चा वापर करून उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्याची परवानगी मिळणार आहे.

या सामंजस्य कराराअंतर्गत उड्डाणपूल आणि मेट्रो व्हायाडक्टसाठी एकत्रित पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकत्रित संरचना उभारण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः जामठा आणि डोंगरगाव येथे प्रस्तावित असलेल्या दोन सहा लेनच्या उड्डाणपूलांसाठी मेट्रो व्हायाडक्टसोबत एकाच संरचनेचा उपयोग केला जाणार आहे. ही रचना वाहनांच्या अंडरपाससाठीही उपयुक्त ठरणार आहे. 

सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये

  • संरचनेचा वापर : एनएचएआय च्या ‘राईट ऑफ वे’चा वापर करून काम होणार
  • डिझाईन मानके: भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार रचना
  • सहकार्य : दोन्ही संस्था वाहतूक व्यवस्थापन, स्थलांतर व रस्त्यांचे पुनर्बांधणीमध्ये एकत्र काम करतील.
  • सुरक्षा व गुणवत्ता : प्रत्येक टप्प्यावर दोन्ही यंत्रणांचे अधिकारी संयुक्त स्थळ पाहणी करतील.

 

कराराचे महत्त्व :हा करार नागपूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी वाहतुकीचे सुलभीकरण, सार्वजनिक परिवहनात सुधारणा आणि जागेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करतो. यामुळे शहरात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीस चालना मिळेल.

टॅग्स :nagpurनागपूरMetroमेट्रोNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण