शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन् जाहीरनामा समितीच्या बैठकीतून के. राजू निघून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:29 IST

अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समितीसमोर मत मांडण्यासाठी बोलाविलेल्या सुमारे १५० तज्ज्ञांपैकी फक्त चार-पाच तज्ज्ञ वेळेत पोहचले. तासाभरानंतरही असेच चित्र असल्याचे पाहून अ.भा. काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे सदस्य के.राजू संतापले व बैठक सोडून हॉटेलमध्ये निघून गेले.

ठळक मुद्देनिमंत्रित ‘तज्ज्ञ’ पोहचलेच नाहीत : शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनीच ठोकली भाषणं

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समितीसमोर मत मांडण्यासाठी बोलाविलेल्या सुमारे १५० तज्ज्ञांपैकी फक्त चार-पाच तज्ज्ञ वेळेत पोहचले. तासाभरानंतरही असेच चित्र असल्याचे पाहून अ.भा. काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे सदस्य के.राजू संतापले व बैठक सोडून हॉटेलमध्ये निघून गेले.कोराडी रोडवरील हेरिटेज लॉन येथे जाहीरनामा समितीची दोन दिवसीय बैठक सोमवारपासून आयोजित करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीचे सदस्य खा. राजीव गौडा यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून या बैठकीसाठी नितीन राऊत व अमोल देशमुख यांच्यावर ‘की पर्सन’ म्हणून जबाबदारी सोपविली होती. या पत्रानंतर चव्हाण यांनी एक पत्र जारी करीत किशोर गजभिये यांना या बैठकीसाठी समन्वयक म्हणून नेमले. जाहीरनामा समितीसमोर आपली मते मांडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ बोलाविण्यासाठी केंद्र, राज्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना आपसात समन्वय साधायचा होता. तर शहर काँग्रेसला बैठक व भोजन व्यवस्था सांभाळायची होती. मात्र, गजभिये यांचे नाव येताच राऊत यांनी अंग काढून घेतले.गजभिये यांनी भोपाळ, मेळघाट, गडचिरोलीसह विदर्भातील सुमारे १४० प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. सर्वच जण येतील असे गजभिये सकाळपासून सांगत होते. सकाळी ११ वाजता के.राजू हे बैठकीसाठी पोहचले. त्यांच्यासोबत नितीन राऊत होते. मात्र, बैठकीसाठी फक्त चार ते पाच प्रतिनिधीच आले होते. दुपारचे १२ वाजले तरी ही संख्या फारशी वाढली नाही. हा ‘पूअर शो’ पाहून के.राजू संतापले व नाराजी व्यक्त करीत हॉटेलमध्ये निघून गेले. यावेळी राऊत व अमोल देशमुख यांनी राजू यांच्यासोबत गाडीमध्ये जाण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, दोघांनाही सोबत न घेता ते एकटेच निघून गेले. शेवटी प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे हे के.राजू यांची समजूत घालण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. तोवर हॉल भरण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावण्याची जबाबदारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. ठाकरे यांनी लागलीच कार्यकर्त्यांना मोबाईल केले व हॉल भरला. या घटनाक्रमानंतर नाराज झालेले के.राजू दुपारच्या सत्रासाठी परत आले. हॉल भरलेला पाहून सुखावले. आलेल्या निवडक तज्ज्ञांसह स्थानिक कार्यकर्त्यांनीही ‘तज्ज्ञ’ बनून भाषणे ठोकली. के. राजूंनीही मार्गदर्शन केले व जाहीरनामा समितीची पहिल्या दिवसाची बैठक पार पडली. यानंतर के.राजू हे पत्रकार परिषद घेणार होते, तसे निरोपही प्रसार माध्यमांना देण्यात आले होते. मात्र, आपण राहुल गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्ती असल्यामुळे पत्रकार परिषद घेणे योग्य होणार नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वाघमारे यांच्यावर ती जबाबदारी सोपवून ते रवाना झाले, असेकाँग्रेसच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आजच्या बैठकीसाठी तज्ज्ञांची जुळवाजुळव सोमवारच्या बैठकीत जाहीरनामा समितीसमोर मते मांडण्यासाठी तज्ज्ञ न पोहचल्यामुळे पोलखोल झाली. ही परिस्थिती पुन्हा आज, मंगळवारच्या बैठकीत निर्माण होऊ नये यासाठी रात्री नियोजन करण्यात आले. बाहेरून बोलाविलेल्या तज्ज्ञ प्रतिनिधींसोबतच स्थानिक तज्ज्ञांची यादी तयार करून त्यांना फोनवर निमंत्रण देण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर