शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार :पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:10 IST

शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे पाच टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आला आहे. त्यामुळे नदीतून जास्त पाण्याची उचल करता येत नाही. पेच प्रकल्पात पर्याप्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार सध्यातरी नाही. येणाऱ्या काळात ती निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील धरण ९५ टक्के भरले आहे. पुढील वर्षीही पाणी अडविण्यात येणार आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी होणार आहे. उन्हाळ्यात टंचाई लक्षात घेता पेचसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घण्यात येणार आहे. त्यांना सर्व स्थितीची माहिती देण्यात येईल. शहरात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पाण्याचा ‘लॉस’ मोठ्या प्रमाणात होत आहे. हा लॉसेस कमी करण्याची गरज आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष दिले पाहिजे. विहिरी आणि बोअरवेल दुरुस्त केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पाण्याच्या वितरणाची जबाबदारी ओसीडब्ल्यू कंपनीकडे देण्यात आली. त्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. यासाठी अनेक कारण जबाबदार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीही त्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोराडी वीज प्रकल्पाला आता पिवळी नदीचेही पाणीवीज प्रकल्प पूर्णपणे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर यावेत, असे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागनदीचे पाणी कोराडी वीज प्रकल्पासाठी वापरले जाते. आता पिवळी नदीतील पाणीही वापरण्यात येणार आहे. यासाठी उप्पलवाडी येथे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWaterपाणी