शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह चिमुकल्यांसोबत मेडिकलने जोडले अनोखे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:16 IST

मेडिकलमध्ये सात महिन्याच्या चिमुकल्यापासून ते ३ ते ११ वर्षांपर्यंतची सहा पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत याची दखल मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. स्वत:च्या पैशातून या मुलांना दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या टुथब्रशपासून ते बिस्कीट, केकपर्यंतचा खाऊ ते देत आहेत. रुग्णासोबतचे एक अनोखे नाते ते जपत आहेत.

ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षक गावंडे यांचा असाही पुढाकार टुथब्रशपासून ते बिस्कीट, चॉकलेटही करून दिले उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात वाढतच चालला आहे. याचा सर्वाधिक फटका बसत आहे तो लहान मुलांना. मेडिकलमध्ये सात महिन्याच्या चिमुकल्यापासून ते ३ ते ११ वर्षांपर्यंतची सहा पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत. यातील बहुतांश गरीब घरातील. अनेकांकडे रोज लागणाऱ्या वस्तूही नाहीत. याची दखल मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. स्वत:च्या पैशातून या मुलांना दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या टुथब्रशपासून ते बिस्कीट, केकपर्यंतचा खाऊ ते देत आहेत. रुग्णासोबतचे एक अनोखे नाते ते जपत आहेत. रुग्णालयाच्या सर्व व्यवस्थापनेची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकावर राहत असल्याने सर्वच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक हे पद तसे काटेरी मुकुट म्हणूनच कुप्रसिद्ध आहे. रुग्णालयीन कामकाज सुरळीत चालावे यासाठी कधी कठोरतेने तर कधी प्रेमाने सर्वांना सोबत घेऊनच त्यांना चालावे लागते. २४ तास ‘अलर्ट’ राहावे लागते. ‘मास कॅज्युल्टी’पासून ते मंत्री, अधिकारी यांच्या आकस्मिक दौऱ्यात सहभागी व्हावे लागते. रुग्णाच्या तक्रारी, नातेवाईकांचे आरोप, निवासी डॉक्टरांचे प्रश्न, परिचारिका व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या विविध समस्याही त्यांनाच सोडवाव्या लागतात. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांचा पाठिंबा व मार्गदर्शनामुळे डॉ. गावंडे यांनी रुग्णालयाची धुरा व्यवस्थित सांभाळली आहे. अधिष्ठात्यांच्या विश्वासाला ते खरे उतरले आहेत. यामुळे रोज नव्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर पडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसोबतच वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील त्यांची चमू दिवस-रात्र काम करीत आहे. सध्या त्यांच्याकडे कोरोनाचे ४५ रुग्ण भरती आहेत. सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णांमधील नवे आव्हान उभे ठाकले आहे ते कोरोना पॉझिटिव्ह चिमुकल्यांचे. यातील अनेकांना आपल्याला येथे का आणले, हे माहितच नाही. एकाच खोलीत त्यांना औषधोपचारासह १४ दिवस काढावे लागणार असल्याने बालसुलभ मनाचा विचार डॉ. गावंडे यांनी केला आहे. ते स्वत: बालरोगतज्ज्ञ आहेत. यामुळे लहान मुलांची मानसिकता ओळखून आहेत, म्हणूनच या रुग्णांकडे ते विशेष लक्ष देत आहेत. त्यांना स्वच्छतेचे धडे देत आहेत. सोबतच ‘पसर्नल हायजिन’ पाळण्यासाठी टुथब्रश, टुथपेस्ट व इतरही वस्तू स्वत:कडून उपलब्ध करून देत आहेत. रुग्णसेवेत चांगला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकल्यांना शाबासकी म्हणून केक, चॉकलेट, बिस्कीट देत आहेत. लवकरच अशा मुलांसाठी काही खेळणी, पुस्तकेही ते उपलब्ध करून देणार आहेत. या मुलांसाठी ते डॉक्टर अंकल झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस