शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : वॉर्ड २५ मध्ये शिरले पाणी, रुग्णांना हलविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 20:45 IST

शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले.

ठळक मुद्दे रुग्णांना पाण्यातून काढावी लागली वाट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले. सर्जरी व मेडिसीन विभागाच्या आकस्मिक विभागासमोर साधारण गुडघाभर पाणी साचले. नातेवाईकांना आपल्या रुग्णांना उचलून आत नेण्याची वेळ आली.मेडिकलमध्यो पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिली घटना नाही. सलग चार-पाच तास मुसळधार पाऊस झाल्यास रुग्णालयात पाणी शिरते. गेल्या वर्षी शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात शिरले. यावेळी खाटेवर दहावर रुग्ण होते. पाहतापाहता गुडघाभर पाणी साचले. पाणी जायला जागा नसल्याने करावे काय, हा प्रश्न होता. डॉक्टर, परीचारिका व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना बाजूच्या वॉर्डात हलविले. विशेष म्हणजे, आकस्मिक विभागाच्या किरकोळ शस्त्रक्रिया गृहातही पाणी शिरले. सर्वत्र पाणीचपाणी असल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. या वर्षी मात्र या विभागात पाणी शिरले नसलेतरी समकक्ष अतिदक्षता विभाग असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पाणी शिरल्याने रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. बाहेर मुसळधार पाऊस आणि वॉर्डात साचत असलेल्या पाण्यामुळे काही वेळेसाठी भीतीचे वातावरण तयार झाले होते. सफाई कर्मचारी, अटेन्डंट यांनी तातडीने रुग्णांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर बसवून वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविले. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरल्यानंतर वॉर्डाची स्वच्छता करण्यात आली.औषधेही भिजलीमुसळधार पावसामुळे मेडिसीन व सर्जरी विभागाच्या अपघात विभागासमोर तीन ते चार फूट पाणी साचले. बाहेरून येणाऱ्या रुग्णांना या पाण्यातून वाट काढत जावे लागले तर गंभीर रुग्णांना उचलून न्यावे लागले. वॉर्ड १७ व १८ च्यासमोरही पाणी साचले होते. अशीच स्थिती २७, ३५ व ३६ समोरील होती. वॉर्ड क्र. ४२ समोरून गेलेली सांडपाण्याची लाईन तुंबल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नेहमीप्रमाणे औषध भांडारात पावसाचे पाणी शिरले. पाणी काढण्याकरिता येथे मोटार पंपाची व्यवस्था आहे. परंतु मुसळधार पावसापुढे पंपाचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. परिणामी, औषधे भिजल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, जमिनीखाली असलेल्या या भांडारासाठी ९ कोटी २१ लाख खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु ही इमारत अद्यापही कुलपात आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयRainपाऊसWaterपाणी