शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

शेकडो बाल, महिला व पुरुषांवर वैद्यकीय उपचार : ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:56 IST

जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १७६९ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात पाच पुरुष व तीन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर सहा महिला स्तन कर्करोगाच्या संशयित आढळून आल्या. १५ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचा तर २२० महिला व पुरुषांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन त्यांना मेडिकलमध्ये बोलविण्यात आले. समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न झाल्याने, या शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक झाले.

ठळक मुद्देबुटीबोरीतील महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : लोकमत व जैन सहेली मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १७६९ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात पाच पुरुष व तीन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर सहा महिला स्तन कर्करोगाच्या संशयित आढळून आल्या. १५ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचा तर २२० महिला व पुरुषांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन त्यांना मेडिकलमध्ये बोलविण्यात आले. समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न झाल्याने, या शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक झाले.लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरखेडी यांच्या सहकार्याने, श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर बुटीबोरी येथे मंगळवारी महाआरोग्य शिबिर पार पडले. त्यात बुटीबोरी, एमआयडीसीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी करून घेतली. यानिमित्ताने ग्रामीण भाग आरोग्याप्रति जनजागृती असल्याचे प्रकर्षाने जाणवले.शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा व सामाजिक कार्यकर्ता मुजीब पठाण उपस्थित होते. यावेळी मंचावर लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र व लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून आदरांजली वाहिली.कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी व रजनी शहलोत यांनी केले. प्रास्तावित लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी केले.समाजाच्या समृद्धतेसाठी महिलांचे आरोग्य सांभाळा-विजय दर्डाविजय दर्डा म्हणाले, आपले घर सांभाळत असताना इतरांच्या वेदना काय आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. समाजात सर्वात महत्त्वाचा अंग म्हणजे महिला, त्या दुर्लक्षित असू नये. त्यांचे जर जीवन समृद्ध करायचे असेल आणि त्यांच्या माध्यमातून समाज समृद्ध करायचा असेल तर त्यांचे आरोग्य सुदृढ असले पाहिजे. म्हणून ज्योत्स्ना यांनी २५ वर्षांपूर्वी एका छोट्याशा खेड्यामधून आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात केली होती. त्याचीच ही परंपरा आहे. शासकीय रुग्णालयात व ‘एम्स’मध्ये आपली सेवा देणाऱ्या डॉक्टरांप्रती नितांत आदर असला पाहिजे. कारण, यांना पैसेच मिळवायचेच असते तर ते खासगी इस्पितळांकडे वळले असते. परंतु त्यांनी सेवेचे व्रत घेतले आहे. शासकीय रुग्णालयांची स्थिती बदलण्यासाठी सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना शासकीय रुग्णालयांमधूनच उपचार घेण्याची सक्ती करावी. यामुळे शासकीय रुग्णालयांची दिशा आणि दशा बदलेल, असेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी समाजात चांगले डॉक्टर शोधून त्यांना पुरस्कृत करण्याचे आवाहन केले. समाजकार्यात आपला वेगळा ठसा उमटविलेले डॉ. विनोद बोरा व डॉ. शैला गांधी यांच्या कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली. डॉ. जसपाल अर्नेजा, डॉ. पिनाक दंदे, डॉ. जय देशमुख, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांच्या सेवाभावी कार्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.आरोग्य शिबिराची गरज-डॉ. जयस्वालडॉ. संजय जयस्वाल म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य शिबिराची नितांत गरज असते. असे शिबिर व्हायलाच पाहिजे. यामुळे जे रुग्ण शासकीय रुग्णालयांपर्यंत पोहचू शकत नाही त्यांना मदत होते. त्यांचे आरोग्य जपण्यास हातभार लागतो. ६० वर्षांवरील वयोवृद्धांची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.रुग्णांचा पाठपुरावा करा-डॉ. मित्रा‘लोकमत’ने ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिराची परंपरा कायम ठेवून समाजाप्रति संवदेनशीलता जपली आहे, असे मत डॉ. सजल मित्रा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, या शिबिरातून रुग्णांचा ‘डाटा बेस’ तयार व्हायला हवा. आजाराचे निदान आणि त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी त्याचा पाठपुरवा होणे गरजेचे आहे. शिबिरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची व पुढील उपचाराची गरज असेल त्यांच्या मदतीसाठी मेडिकल पुढाकार घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. किडनी प्रत्यारोपण, न्यूरो सर्जरी, हृदय सर्जरी सारख्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी मेडिकलवर रुग्णांचा विश्वास वाढत असल्याचेही ते म्हणाले.प्री-कॅन्सरच्या धोक्याला गंभीरतेने घ्या - डॉ. गणवीरडॉ. सिंधू गणवीर म्हणाल्या, ज्योत्स्ना दर्डा यांनी सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले. असे सामाजिक उपक्रम त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. दंतरोग म्हणजे केवळ दाताशी संबंधितच रोग नाही तर मुखाशी संबंधित कॅन्सरपासून तर इतरही रोगावर उपचार केले जातात. आपल्याकडे तंबाखू व खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे अनेक रुग्ण ‘प्री-कॅन्सर’चे आढळून येतात. हा धोका वेळीच लक्षात येऊन उपचार घेतल्यास कॅन्सरला दूर ठेवणे सहज शक्य आहे, असेही त्या म्हणाल्या.नागरिकांना दिले ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडेअचानक हृदय शस्त्रक्रिया बंद पडली की मेंदूला प्राणवायूचा पुरवठा बंद होतो. पुढील चार-पाच मिनिटात मेेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला नाही तर मेंदूचे कार्य पूर्ण बंद होते आणि मेंदू मृत अवस्थेत जातो. म्हणूनच मेंदूचा मृत्यू होऊ नये यासाठी कोणतीही उपकरणे किंवा साधने हाती नसताना सर्वसामान्य नागरिकांनी काय काय करावे, याची माहिती प्रात्यक्षिकेतून मेडिकलच्या बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे व डॉ. सचिन साळवे यांनी दिली. ‘मॅनीकीन’वर प्रात्यक्षिक देऊन त्यांच्याकडून ते करूनही घेतले.चिमुकली मनश्रीसाठी शिबिर ठरले आशेचे किरणचंद्रपूर येथील देवाला तहसील येथून आलेली एक पाच वर्षीय चिमुकली मनश्री डांगे हिच्या हृदयाला छिद्र आहे. तिचे वडील विलास डांगे एमआयडीसी येथे कामाला आहेत. वडिलांच्या आग्रहानुसार तिच्या आजीने आणि काकाने तिला शिबिरात आणले. मेडिकलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. बापू येलम यांनी तिला तपासले. ते म्हणाले, मनश्रीला शस्त्रक्रियेची गरज नाही. पाच वर्षात छिद्र बंद होते. तरीही एकदा तपासणीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेऊन ‘ईको’ करण्याचा सल्ला दिला. गरज पडल्यास पुढील उपचार शासकीय योजनांमधून करता येईल, असे मार्गदर्शनही केले. डॉक्टरांच्या या सल्ल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. शिबिरातून बाहेर पडताना तिच्या आणि नातेवाईकांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता. हे शिबिर त्यांच्यासाठी एक आशेचे किरण ठरले.२२० महिला व पुरुषांना मोतीबिंदूशिबिरात डोळ्यांची तपासणी करण्यात आलेल्या २२० महिला व पुरुषांना मोतीबिंदू आढळून आले. संबंधित डॉक्टरांनी या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती दिली. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात बोलावूनही घेतले. शिबिरात येताना या महाआरोग्य शिबिराची फाईल, मूळ आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत ठेवण्याचा सल्लाही दिला.यांनी दिली आरोग्य सेवाबोरखेडीचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी, डॉ. हर्षदा फटिंग, डॉ. संजय गुज्जनवार, मेडिकलचे डॉ. गिरीश भुयार, दंत महाविद्यालयाचे डॉ. सचिन खत्री, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. रितेश कळसकर, डॉ. सुभाष कुंभारे, डॉ. अरुण खळीकर, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. अंकित शर्मा, डॉ. सुनिता कन्नाके, दीपांशु पाहूजा, शुभंकर नादखेडकर, क्षितिजा ठेंगडी, शिवानी सिंग, आरती ओबेरॉय, ऐश्वर्या पाटील, रजत तिवारी, मेडिकलचे डॉ. उन्मेद चांडक, डॉ. महेश सोनी, डॉ. कुबेर साखरे, डॉ. कांचन सेलोकर, डॉ. मृणाल गायकवाड, डॉ. शाश्वती घोष, डॉ. ऐश्वर्या शहा, डॉ. कोमल रॉय, डॉ. बापू येलम, डॉ. अनिता हिरणखडे, डॉ. कोमल शिंदे, डॉ. पूजा अंबादे, डॉ. प्रतीक्षा जिभकाटे, डॉ. मृणमाया धनगवळी, डॉ. भूमिका पडोळे, डॉ. सुरभी उदासी, डॉ. भूषण पाटील, डॉ. भैयालाल, नितीन चौधरी, डॉ. रिद्धिता पाटील, डॉ. मृणालिनी भोयर, डॉ. अभिषेक पांडे, डॉ. सुरेश रुखले, डॉ. विजय मोहविया, डॉ. अभिनव टेगळे, डॉ. रामेश्वर पवार, डॉ. सुनीत हजारे, डॉ. पंकज घोलप, डॉ. फौजिया नाज, समाजसेविका पौर्णिमा घवघवे, परिचारिका मृणालिनी भोयर आदींचा समावेश होता. लोकमतचे इव्हेंट मॅनेजर आतिश वानखेडे व सहकाऱ्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.यांचे मिळाले सहकार्यशिबिराच्या

शिबिराच्या आयोजनासाठी जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा, सचिव रजनी शहलोत, सहसचिव स्मिता मुनोत, कार्यकारी सदस्य किरण दर्डा, लिना टाटिया, अमिषा नगरवाला व डॉ. शैला गांधी यांचे सहकार्य मिळाले. 

 

टॅग्स :Healthआरोग्यLokmat Eventलोकमत इव्हेंट