शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मेडिकलची रोबोटिक सर्जरी वादात, सिस्टिम खरेदी आदेशाला आव्हान

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 19, 2024 15:50 IST

इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया कंपनीची हायकोर्टात याचिका

नागपूर : मध्य भारतातील गरजू नागरिकांचा आधारस्तंभ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)करिता रोबोटिक सर्जरी सिस्टिम खरेदी करण्याचा आदेश वादात सापडला आहे. बेंगळुरू येथील इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया कंपनीने या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

रोबोटिक सर्जरी सिस्टिम खरेदीच्या टेंडरमध्ये इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया, गुरुग्राम येथील सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन व रायपूर येथील बागरी एंटरप्राईज या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामधून सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन कंपनीला ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सिस्टिम खरेदीचा आदेश जारी करण्यात आला. त्यावर इंटुईटिव्ह कंपनीचा आक्षेप आहे.

मेडिकल अधिष्ठात्यांनी सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी अधिकार नसताना टेंडरच्या अटी शिथिल केल्या. सुधीर श्रीवास्तावसह बागरी एंटरप्राईजही या टेंडरकरिता पात्र नाही. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना अपात्र घोषित करून वादग्रस्त खरेदी आदेश रद्द करण्यात यावा, असे इंटुईटिव्ह कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय कंपनीने स्वत:ला खरेदी आदेश देण्याची मागणी केली आहे. या सिस्टिमसाठी २० कोटी ६२ लाख ४२ हजार ९६२ रुपये मिळाले आहेत. परंतु, विविध कारणांमुळे सिस्टिमची खरेदी २०१८ पासून रखडली आहे.

मेडिकल अधिष्ठात्यांना नोटीस जारीयाचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मेडिकल अधिष्ठाता, सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन व बागरी एंटरप्राईज यांना नोटीस बजावून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड. एम. जी. भांगडे व ॲड. रितेश बढे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर