शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मेडिकल : एनएमसी विरोधात निवासी डॉक्टरांची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:19 IST

‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) बुधवारी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले आहे. गुरुवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर निवासी डॉक्टरांनी हातात फलक घेऊन जोरदार नारेबाजी केली.

ठळक मुद्देनवे विधेयक गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) बुधवारी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले आहे. गुरुवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर निवासी डॉक्टरांनी हातात फलक घेऊन जोरदार नारेबाजी केली.मेडिकल मार्डचे शुभम इंगळे म्हणाले, जुन्या विधेयकानुसार खासगी मेडिकल कॉलेजमधील ८५ टक्के जागांवर शासनाचे नियंत्रण असायचे. परंतु नवा कायदा ‘एनएमसी’मुळे आता केवळ ५० टक्के जागांवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. उर्वरित ५० टक्के जागांवरील शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य त्या कॉलेजेसना देण्याची तरतूद आहे. यामुळे गरीब घरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महागणार आहे. नव्या कायद्यात ‘ब्रीजकोर्स’ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ‘बीएएमएस’ डॉक्टरांनी हा ‘कोर्स’ केल्यास त्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमामध्ये एकच परीक्षा असणार आहे. यामुळे यात भ्रष्टाचार फोफावून गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, म्हणूनच ‘मार्ड’ने या कायद्याला विरोध केला आहे. तूर्तास तरी संपाचा विचार नाही. ‘सेंट्रल मार्ड’ने तशा सूचना केल्यास कामबंद आंदोलनही उभारले जाईल, असेही इंगळे म्हणाले. यावेळी २०० वर निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर हातात फलक घेऊन ‘एनएमसी’ विधेयकाच्या विरोधात निदर्शने करीत लक्ष वेधले.

टॅग्स :doctorडॉक्टरagitationआंदोलन