शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय झाले ६२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:20 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणारा परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात सुमारे १०-१२ हजार डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयातून मात्र प्रशासनिक सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य विभाग : १० हजार डॉक्टरांना फायदा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणारा परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात सुमारे १०-१२ हजार डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयातून मात्र प्रशासनिक सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणारे संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय आणि राज्य कामगार विमा योजना कार्यालयातील संचालक (वैद्यकीय), वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश प्रशासानिक सेवेमध्ये करण्यात आला आहे. त्यांचे वय ५८ वरून ६० करण्यात आले. हा निर्णय ३१ मे २०२३ पर्यंत कायम असणार आहे. परंतु या पदावरील अधिकारी वगळता जे वैद्यकीय अधिकारी थेट रुग्णसेवेशी निगडित आहेत त्याच अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्यात आले. परंतु याची मुदत दोन वर्षांसाठी, म्हणजे, ३१ मे २०२१ पर्यंतच देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ३१ मे २०१९ पासून हा निर्णय लागू केल्याने याचा फायदा सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही होणार आहे. जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेत कार्यरत असेल, तोपर्यंतच वयोमर्यादा वाढ लागू राहिल, हा नियमही आखून दिला आहे.पदोन्नतीचा मार्ग मोकळासेवानिवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्याच्या निर्णयातून प्रशासनिक पदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वगळण्यात आल्याने रुग्णसेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) या संदर्भात वेळोवेळी निवेदनातून लक्षही वेधले होते.डॉ. प्रमोद रक्षमवारसरचिटणीस, मॅग्मो

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य