शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

मेडिकल : काळी रिबीन बांधून परिचारिकांची रुग्णसेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:44 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) परिचारिकांनी सोमवारी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा देत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देजुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर: जुनी पेन्शन योजना लागू करा व सर्व संवर्गातील वेतन त्रूटी दूर करा या दोन मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने ९ सप्टेंबरचा लाक्षणिक संपाचा इशारा दिला होता. परंतु कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या इतर ठिकाणी आलेल्या नैसर्गिक संकटामुळे संप मागे घेतला, परंतु सोमवारी काळी रिबीन बांधून परिचारिकांनी रुग्णसेवा देत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ४५०वर परिचारिकांनी काळ्या रिबीन बांधून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शाखा नागपूरचे सचिव शहजाद बाबा खान म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व संवर्गातील वेतन त्रूटी दूर करा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते द्या, केंद्राप्रमाणे महिलांना प्रसूती व बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करा, यासह सात मागण्यांना घेऊन एक दिवसीय संपाचा निर्णय घेतला. ९ सप्टेंबरला राज्यातील परिचारिका संपावर जाणार होत्या. परंतु नैसर्गिक संकाटात राज्यातील अनेक भाग सापडल्याने रुग्णसेवेला प्राधान्य देत संप मागे घेतला. परंतु सोमवारी काळी रिबीन बांधून लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. राज्याची पूरस्थिती पूर्ववत होताच व तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास संघटना तीव्र आंदोलन हाती घेईल, असा इशाराही बाबा खान यांनी दिला.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयagitationआंदोलन