शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात मातृ दुग्ध पेढीसाठी मेडिकलचा पुढाकार : जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:15 AM

आईच्या दुधापासून वंचित राहिलेल्या बाळाला वरचे म्हणून गाई-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही फारच अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतुसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडते. अशा बाळांसाठी ‘ह्यूमन  मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव तयार केला होता. परंतु जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला. अखेर मेडिकलने या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला असून अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी जागेची पाहणी केली, सोबतच नव्याने प्रस्ताव पाठविण्याचा सूचना संबंधितांना दिल्या.

ठळक मुद्देआईच्या दूधापासून दुरावलेल्या शिशुंना मिळणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईच्या दुधापासून वंचित राहिलेल्या बाळाला वरचे म्हणून गाई-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही फारच अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतुसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडते. अशा बाळांसाठी ‘ह्यूमन  मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव तयार केला होता. परंतु जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला. अखेर मेडिकलने या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला असून अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी जागेची पाहणी केली, सोबतच नव्याने प्रस्ताव पाठविण्याचा सूचना संबंधितांना दिल्या.माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाºया बाळाचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात. अमृतासमान असलेलं आईच्या दुधापासून नवजात अर्भक वंचित राहतात. अनथालय आईच्या दुधाची तहान दुधाची पावडर, बाटली किंवा बालान्नाने (बेबी फूड) भागवितात. यामुळे अशा मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. यावर उपाय म्हणून ‘मातृ दुग्ध पेढी’ची मागणी अनाथालयांकडून होत आहे. शासकीय रुग्णालयात याची सोय झाल्यास याचा फायदा अनाथालयांनाच नाही तर अनेक कारणांमुळे ज्या आईंना दूध पाजता येत नाही त्यांनाही होण्याची शक्यता आहे. मानवी दुग्ध पेढीची गरज लक्षात घेऊन मेयोच्या बालरोग विभागाच्या तत्कालीन विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी रोटरीच्या मदतीने मानवी दुग्ध पेढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. जिल्हा विकास नियोजन समितीने मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात ही पेढी व्हावी म्हणून प्रत्येकी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु मेयोने या प्रकल्पासाठी जागा नसल्याचे सांगून हात वर केले. मेडिकलने सुरुवातीला उदासीनता दाखवली. परंतु अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्याकडे प्रस्ताव येताच गेल्या चार दिवसांपासून जागा पाहणे, नवीन प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली. यामुळे येत्या काळात मेडिकलमध्ये मानवी दुग्ध पेढी सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.अशी असणार ‘मिल्क बँक’बाळंतपणानंतर काही वेळेस आईच्या शरीरात बाळाच्या गरजेपक्षा जास्त दूध तयार होते. अशा वेळेस ते दूध फेकून न देता त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार होते. या दुधाचा उपयोग अपुऱ्या दिवसांच्या बाळांसाठी किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या बाळांसाठी केला जाणार होता. शिवाय ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर बाळाला पाजण्यासाठी अजिबातच दूध येत नाही त्यांना किंवा आईने सोडून दिलेल्या बाळासाठी मातृदुग्ध पेढीतील दुधाचा उपयोग होऊ शकतो.पेढीतील दूध आरोग्यासाठी सुरक्षितआईच्या दुधाएवढेच हे दूध सुरिक्षत असल्याचा दावा, डॉक्टरांनी केला आहे. त्यांच्या मते बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणाऱ्या स्त्रीच्या दुधाची साठवण केली जाते. हे दूध शास्त्रोक्त पद्धतीने साठवले जाते. ब्रेस्ट पंपाच्या मदतीने स्टील कंटेनरमध्ये साधारण पाच मिलीलिटर दूध काढून घेतले जाते. मग हे दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाते. प्रयोगशाळेतून दुधाची शुद्धता तपासल्यावर आईकडून दूध घेतले जाते. दुधाचे कल्चर केले जाते. या प्रक्रि येमुळे दूध स्तनपानाच्या दुधाइतकेच चांगले आणि पौष्टिक राहते.‘लोकमत’ने केला पाठपुरावामेयो, मेडिकलमध्ये ‘मातृ दुग्धपेढी’ची किती गरज आहे, या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने लावून धरले होते. मेयोमध्ये ही पेढी सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना जागा नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. ‘लोकमत’ने ‘मातृदुग्ध पेढीचा प्रस्ताव बारगळला’ या मथळ्याखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते. अखेर मेडिकलने आता यात पुढाकार घेतला आहे. यामुळे पेढीचा मार्ग मोकळा झाला असून अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे.मेडिकलमध्येच मातृदुग्ध पेढी होणारआईचे दूध उपलब्ध न होऊ शकणाऱ्या बाळांसाठी ‘मातृदुग्ध पेढी’चा पर्याय योग्य आहे. बाळाला पहिले चीक दूध पाजलेच पाहिजे; पण कधी कधी दुर्दैवाने आईचं दूध बाळाला देता येत नाही. तेव्हा पर्याय उरतो तो या पेढीचा. मेडिकलमध्ये अशा रुग्णांची संख्या पाहता ही पेढी सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे नव्याने प्रस्ताव तयार करण्यास सांगितला आहे. प्रस्तावित जागाही पाहून ठेवली आहे. यामुळे लवकरच ही पेढी मेडिकलमध्येच सुरू होईल.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :milkदूधbankबँकGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय