शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वैद्यकीय व्यवसायातील मूल्ये हरविली

By admin | Updated: March 20, 2017 01:57 IST

वैद्यकीय व्यवसाय मूल्यहीन झाला असून, रुग्णांची जास्तीतजास्त आर्थिक पिळवणूक करण्याचाच विचार सध्या होतो,

सतीश गोगुलवार यांचे मत : ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना’मध्ये प्रकट मुलाखत नागपूर : वैद्यकीय व्यवसाय मूल्यहीन झाला असून, रुग्णांची जास्तीतजास्त आर्थिक पिळवणूक करण्याचाच विचार सध्या होतो, असे खळबळजनक मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार यांनी वैद्यांचे महत्त्व सांगताना व्यक्त केले. वनौषधी वापरून विविध आजारांवर उपचार करणारे वैद्य गुरू-शिष्य परंपरेतून तयार होतात. ते कधीच पैशांचा हव्यास करीत नाहीत. रुग्णाने स्वत:हून दिले तेवढे पैसे ते ठेवून घेतात. त्यामुळे त्यांच्या उपचाराला व्यवसायाचे स्वरूप आले नाही. ते सेवा म्हणून हे काम करतात. सामाजिक मूल्ये जपल्यामुळे त्यांनी पैसा कमावला नाही. शेती व अन्य व्यवसायांतून ते स्वत:चा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासारखी मूल्ये डॉक्टरांमध्ये दिसून येत नाहीत, असे गोगुलवार म्हणाले. नष्ट होत चाललेली वैद्यांची उपचार पद्धत जिवंत ठेवण्यासाठी लेखी माहिती नोंदविण्यासह अन्य आवश्यक उपाययोजना सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रयास व सेवांकुर संस्थेच्या ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना’ या उपक्रमांतर्गत रविवारी सिव्हिल लाईन्सस्थित चिटणवीस सेंटर येथे डॉ. गोगुलवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती देतानाच विविध विषयांवर परखड विचार व्यक्त केले. ही ३६ वी प्रकट मुलाखत होती. संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी डॉ. गोगुलवार यांना प्रश्न विचारले. या उपक्रमाशी जुळलेल्या प्राजक्ता अतुल व्यासपीठावर उपस्थित होत्या. गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण का कमी आहे, या प्रश्नाच्या उत्तरातून गोगुलवार यांनी अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरी समस्या प्रकाशात आणली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाशी एकरूप झाले आहेत. ते शेतीसोबत मोहफुले व तेंदुपत्त्यातून पैसे मिळवितात. शेतीमध्ये स्वत:ची बियाणे वापरतात. रासायनिक खतांचा वापर करीत नाहीत. बँका व सावकारांकडून कर्ज काढत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून आवश्यक खर्च करतात. खाण्याच्या बऱ्याच गोष्टी त्यांना जंगलातून उपलब्ध होतात. परिणामी आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत नाही. अन्य जिल्ह्यांत रोख पिके घेण्यासाठी भरमसाट कर्ज घेऊन शेतीमध्ये पैसा ओतला जातो. अशा वेळी नापिकी झाल्यास शेतकरी आत्महत्या करतात, अशी दाहक माहिती गोगुलवार यांनी दिली. चांगल्या भविष्यासाठी जल, जमीन व जंगलांचे रक्षण करणे आवश्यक आहे. प्रभावी वनौषधी व पौष्टिक खाद्य जंगलातून उपलब्ध होते. अन्न व पाणी दिवसेंदिवस विषारी होत असल्यामुळे विविध गंभीर आजार तोंड वर काढत आहेत. पंजाबमध्ये दूषित पाणी व प्रदूषणामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. हा आजार आता सर्वत्र पसरत आहे. आपल्याकडे आजार झाल्यावर उपचार घेतले जातात. परंतु आजाराला दूर ठेवण्याचे प्रयत्न होत नाहीत. आरोग्य सुदृढ ठेवणे आपल्या हातात आहे, याकडे गोगुलवार यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी) गोगुलवार यांचा अल्प परिचय १९७५ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातील चळवळीदरम्यान स्थापन झालेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनी संघटनेमध्ये गोगुलवार यांनी कार्य केले आहे. येथे त्यांच्यावर समाजकार्याचे संस्कार झाले. त्यामुळे त्यांनी १९८१ मध्ये एम.बी.बी.एस. झाल्यानंतर आणि घरी व्यापारी पार्श्वभूमी असतानाही वैद्यकीय व्यवसाय थाटून पैसा कमावला नाही. त्यांनी १९८४ मध्ये पत्नी शुभदा देशमुख यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी कार्य सुरू केले. त्याकरिता ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था स्थापन केली. सध्या ही संस्था गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील २०० गावे तर, नागपुरातील ४५ झोपडपट्ट्यांमध्ये कार्यरत आहे. गोगुलवार यांनी स्थानिक पातळीवर उपचार करणाऱ्या वैद्यांसोबत २० वर्षे काम करून झाडपाला व अन्य उपचारांचा अभ्यास केला आहे. त्यांनी देशभरातील १५०० वर महिलांना औषधे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.