शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

तर नागपूर विद्यापीठ  देणार महापुरुषांच्या नावाने पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:37 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके पारितोषिके प्रदान करण्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीपासून पदकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही स्थितीत एकाही महापुरुषाच्या नावे असलेले पदक रद्द होणार नाही. वेळ पडलीच तर विद्यापीठ यासाठी निधीची तरतूद करेल, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देएकूण पदक-पारितोषिकांची संख्या कमी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके पारितोषिके प्रदान करण्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीपासून पदकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही स्थितीत एकाही महापुरुषाच्या नावे असलेले पदक रद्द होणार नाही. वेळ पडलीच तर विद्यापीठ यासाठी निधीची तरतूद करेल, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली. जर सुधारित धनादेश देणे शक्य नसेल तर मूळ अनामत रक्कम दानदात्यांचे कुटुंबीय घेऊन जाऊ शकतात, असेदेखील स्पष्ट करण्यात आले.विद्यापीठाने यासंबंधात ३४३ दानदात्यांना पत्र पाठविले. यातील ३५ जणांनी अतिरिक्त रक्कम भरण्याची तयारी दाखविली आहे. १७ जणांनी अनामत रक्कम परत मागितली आहे. २८ जणांचा विद्यापीठाकडे पत्ताच उपलब्ध नाही तर १०१ जणांची पत्रे परत आली आहेत. उर्वरित दानदात्यांनी विद्यापीठाला अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.विद्यापीठाला अनिच्छेने हे पाऊल उचलावे लागत आहे. मात्र बाजारभाव व मूळ अनामत रकमेवरील व्याज यांची सांगड घालणे कठीण झाले आहे; शिवाय आता करदेखील वाढले आहेत व ठेवींवरील व्याज घटले आहे. त्यामुळे आम्ही दानदात्यांना आवाहन केले आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. परंतु कुठल्याही परिस्थितीत महापुरुषांच्या नावे असलेली पदके-पारितोषिके रद्द होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.पदकांचे समान वाटप व्हावेनागपूर विद्यापीठात काही अभ्यासक्रमांमधील गुणवंतांना मोठ्या प्रमाणात पदके-पारितोषिके मिळतात. परंतु दानदात्यांनी पुढाकारच घेतला नसल्याने काही अभ्यासक्रमांत एकही पदक किंवा पारितोषिक नाही, अशी स्थिती आहे. गुणवंत विद्यार्थ्यांवर हा एकप्रकारे अन्यायच आहे.पदकांचे समान वाटप व्हावे,अशी विद्यापीठाची भूमिका असून यानंतर येणाऱ्या नवीन दानदात्यांना अशा अभ्यासक्रमांसाठी निधी देण्यासंबंधात आवाहन करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर