शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसीबी’मधील मी टु प्रकरण :  महिला पोलिसाने दिले ‘व्हॉईस सॅम्पल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:23 IST

लाचलुचपत विभागाचे निलंबित अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने (व्हॉईल सॅम्पल) घेण्यात आले. मंगळवारी प्रकरणाचा तपास करीत असलेले झोन २ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पीडित महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. ४ डिसेंबरला पाटील यांच्याविरुद्ध सदर ठाण्यात छेडखानी, धमकी देणे आणि बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकावर झाला होता गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत विभागाचे निलंबित अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने (व्हॉईल सॅम्पल) घेण्यात आले. मंगळवारी प्रकरणाचा तपास करीत असलेले झोन २ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पीडित महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. ४ डिसेंबरला पाटील यांच्याविरुद्ध सदर ठाण्यात छेडखानी, धमकी देणे आणि बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पीडित महिला पोलीस शिपाई जानेवारी २०१६ मध्ये ग्रामीण पोलिसात लाच लुचपत विभागात आली होती. ती अविवाहित आहे. मे २०१७ मध्ये पाटील एसीबीत तैनात होते. पाटील यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये महिला पोलीस शिपायास आपल्या कक्षात बोलावले. त्यानंतर तिला त्रास देणे सुरू केले. पाटील तिला व्हॉट्सअप आणि व्हिडीओ कॉल करून त्रास देत होते. आपत्तीजनक गोष्टी करून शरीर सुखाची मागणी करीत होते. तिला अश्लील फोटो काढून पाठविण्यासाठी दबाव टाकत होते. आपली मागणी पूर्ण न केल्यानंतर एसीबीच्या एका अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप लावत बदनाम करून एसीबीमधून मूळ विभागात परत पाठविण्याची धमकी देत होते. त्यानंतरही तिने ऐकले नसल्यामुळे त्यांनी कार्यमुक्त केल्याचा आदेश जारी केला होता. पीडित महिला पोलीस शिपायाने एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांना घटनेची तक्रार केली होती. बर्वे यांच्या निर्देशावर तक्रारीचा तपास विशाखा कमिटीला सोपविण्यात आला. विशाखा कमिटीच्या तपासानंतर ४ फेब्रुवारीला पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वीच ते फरार झाले होते. त्यांनी न्यायालयातून जामीन मिळविला होता. आठवडाभरापूर्वी पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. पीडित महिला शिपायाने पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेचे रेकॉर्डिंग केले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग पोलिसांना सोपविले. त्यानंतर हे रेकॉर्डिंग तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यानंतर पीडित महिला पोलिसाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत.

टॅग्स :Metoo CampaignमीटूPoliceपोलिस