शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कुख्यात शाहरूख कसाई टोळीवर मकोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 13:40 IST

हसनबाग परिसरात अनेक वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शाहरूख उर्फ कसाई अकरमच्या टोळीतील गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून हसनबागमध्ये दहशत नागरिकांनी टाकला सुटकेचा श्वास

नागपूर : हसनबाग परिसरात अनेक वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शाहरूख उर्फ कसाई अकरमच्या टोळीतील गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला. या कारवाईमुळे त्या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

२३-२४ ऑक्टोबरच्या रात्री या टोळीतील गुंडांनी इरफान उर्फ भोला रऊफ खान नामक तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला होता. गंभीर जखमी झालेल्या इरफानच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विक्की, तनवीर, सोहेल आणि फरदीनला अटक करून पोलिसांनी कारागृहात डांबले तर शाहरूख कसाई, नद्दू, गोलू, अयफाज, शहबाज तसेच बशिर फरार आहेत. त्याची चाैकशी करताना परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी या गुन्हेगारांची कुंडली बाहेर काढली.

ते अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असून, त्यांच्यामुळे हसनबागमधील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाची चाैकशी सहायक आयुक्त गणेश बिराजदार यांच्याकडे सोपविली. त्यांनी ठाणेदार किशोर नगराळेंच्या मदतीने तपास केल्यानंतर अहवाल उपायुक्त हसन यांना सोपविला. त्यानुसार, या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता उपायुक्त नुरुल हसन यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे नोंदवली. आयुक्तांनी त्याला मान्यता देताच गुरुवारी या टोळीवर मकोका लावण्यात आला.

टोळीतील कुख्यात गुंड

शाहरूख उर्फ कसाई अकरम (वय २४, टोळीचा सूत्रधार), शेख जावेद उर्फ गोलू सय्यद अकरम (वय १९), फरदिन खान फिरोज खान (वय २०), मोहम्मद नदिम उर्फ नद्दू मोहम्मद ईब्राहिम (वय २२) , शेख अहफाज शेख असलम (वय २३), शेख बशिर शेख अकिल (वय १९), शहबाज खान शेर खान, सोहेल अली हसन अली, तनवीर अली हसन अली, फरदीन खान फिरोज खान आणि वसंता फरकुडे अशी मकोका लावण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदा