शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेयोच्या समस्यांना घेऊन अधिष्ठात्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:12 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सोई व आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या समस्येला घेऊन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने मध्य नागपूर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना घेराव घातला. सोबतच तातडीचे समस्या सोडविण्याची मागणी केली.

ठळक मुद्देमध्य नागपूर काँग्रेसचा पुढाकार : सोई व उपकरण उपलब्ध करून देण्याची मागणीलोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सोई व आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या समस्येला घेऊन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने मध्य नागपूर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना घेराव घातला. सोबतच तातडीचे समस्या सोडविण्याची मागणी केली.विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने नुकतेच मेयोमध्ये ‘एमआरआय’व अद्ययावत ‘सिटी स्कॅन’ यंत्र नसल्याने एमबीबीएससह पदव्युत्तर जागा धोक्यात आल्याच्या व रुग्णांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत हा घेराव घालण्यात आला होता.मेयोमधील गैरसोईंना घेऊन मध्य नागपूरचे महासचिव राजेश कुंभलकर व शहर उपाध्यक्ष रवी गाडगे पाटील यांनी समस्या मांडल्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष हाजी शेख हुसेन, नगरसेवक रमेश पुणेकर, माजी नगरसेवक रमण पवार, ब्लॉक अध्यक्ष महेश श्रीवास प्रामुख्याने उपस्थित होते. कुंभलकर यांनी रुग्णालयात तातडीने सिटी स्कॅन, एमआरआय, सिकलसेल रुग्णांसाठी गर्भजल परीक्षण यंत्र, रुग्णवाहिका व इतरही आवश्यक उपकरणे तातडीने उपलब्ध करून देण्याची व औषधांचा तुटवडा दूर करण्याची मागणी केली. शेख हुसेन यांनी ओपीडी व आयपीडीमध्ये २४ तास वरिष्ठ डॉक्टर तैनात राहत नसल्याची तक्रार केली. श्वान चावल्यानंतर रेबीज बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचण्याकरिता असलेली‘अ‍ॅण्टी रेबिज’ लस नसल्याकडे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी लक्ष वेधले. अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वसन दिले. शिष्टमंडळात शुभम लखोटिया, राजू असले, संजय पाटील , शालिकराम चरडे ,मनोज मालविया, बाबा राऊत,मोहम्मद शकील, रजनीश सूर्यवंशी, मोहम्मद कलीम, गजानन साबळे, देवेंद्र सूर्यवंशी, अब्दुल नाजू, बंटी साळुंखे ,अजय गावंडे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस