शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

महापौरांच्या आदेशाला राज्य सरकारकडे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:57 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. यासोबतच महापौर व आयुक्तातील वाद आता राज्य सरकारच्या दरबारात पोहचला आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे व महापालिकेतील सत्ताधारी यांच्यात संघर्ष सुरू आहे. याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले होते. अद्यापही हा संघर्ष सुरूच आहे.सभागृहातील आदेशानुसार ६ जुलैपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळाली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करून तीन दिवसात याबाबतचा अहवाल सादर करा, असे निर्देश संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात दिले होते. मात्र, आयुक्तांनी आदेशानुसार याबाबतचा अहवाल सादर न करता महापौरांचे आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा २६ जून रोजी घेण्यात आली. या वादळी सभेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला होता. पालिकेची ही सभा संपूर्ण राज्यभरात गाजली. सभेत महापौर जोशी यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले होते.६ जुलैपर्यंत निर्देशांवरील कारवाईचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यासाठी सांगितले होते. महापौरांनी एलईडी पथदिव्यांची नस्ती १३५ दिवस लेखा व वित्त विभाग अधिकाऱ्यांनी स्वत:जवळ ठेवल्याबाबत त्यांच्या मूळ विभागाला डिसिप्लीन कार्यवाही करण्याची शिफारस करणे, डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शिलू गंटावार यांच्या गैरव्यवहाराबाबत त्यांचे तात्काळ निलंबन करून स्थायी समिती अध्यक्ष यांच्या समितीने त्यांची चौकशी करणे. शहरातील कामाच्या संविदाबाबत माहिती स्थायी समितीपासून लपवून ठेवणे, या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे याबाबत आयुक्तांनी आपले स्पष्टीकरण सादर करावे. नियमानुसार स्थायी समितीच्या अनुमतीने राज्य शासनाकडुन आयुक्त, अति.आयुक्त यांनी सुट्यांची मंजुरी घेणे अपेक्षित असताना रजेबाबत स्थायी समितीची परवानगी घेतली नाही, याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण सादर करावे. सर्व निर्देशावर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. परंतु मनपा प्रशासनाने महापौरांचे आदेश विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.अधिकार राज्य शासनालासन २०११ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९, कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या कलमानुसार विविक्षित प्रकरणात महापालिकेचा किंवा इतर प्राधिकाऱ्याचा कोणताही ठराव किंवा आदेश शांतता भंग करत असेल, लोकांना किंवा व्यक्तीच्या कोणत्याही वर्गाला हानी वा त्रास होण्याचा धोका आहे किंवा महापालिकेस आर्थिक हानी पोहचत असेल तर आदेश निलंबित किंवा विखंडित करण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. मात्र महापौरांच्या आदेशामुळे कोणती हानी पोहचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेState Governmentराज्य सरकार