शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो पाहून जर्मनीच्या कार्ल्सरूहचे महापौर प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:14 IST

जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले.

ठळक मुद्दे मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले : सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो फायद्याची

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले.महापौर डॉ. फ्रँक यांच्या नेतृत्वात सरकारी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आठ जणांच्या शिष्टमंडळाने मेट्रोने सीताबर्डी ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला. नागपूर मेट्रो प्रकल्पाची गुणवत्ता आणि वेगवान कामाचे कौतुक केले.जर्मनीच्या कार्ल्सरूह या शहरात २०१० पासून ३.५ किमी भूमिगत मेट्रो बनविण्याचे काम सुरू असून ते अजूनही पूर्ण झाले नाही. नागपूर मेट्रो २०१५ मध्ये सुरू होऊन चार वर्षांत ३८ किमी कार्यापैकी अर्ध्याहून अधिक कार्य पूर्ण केले आहे. दोन मार्गिकेवर मेट्रो धावायला लागली आहे. हे अचंबित करणारे आहे. मी अत्यंत प्रभावित झालो आहे, असे उद्गार त्यांनी काढले.सकाळी ९ वाजता शिष्टमंडळाने सीताबर्डी इंटरचेंज ते एअरपोर्टपर्यंत प्रवास करीत स्थानकावर उतरले. एअरपोर्ट स्थानकावरील महात्मा गांधींच्या कुटीजवळ येऊन त्यांनी मानवंदना दिली आणि स्थानकावरील सोईसुविधांचा आढावा घेतला. या स्थानकावरील फीडर सर्व्हिस म्हणजे ई-सायकल, ई-बाईक चालवून पहिली. परतीच्या मेट्रो प्रवासात प्रवाशांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांशी बोलून प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.भविष्यात सुरक्षित प्रवास करायचा असेल आणि रहदारीच्या समस्या टाळायच्या असतील तर मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक विकासाची गती वाढवायला हवी. प्रदूषणमुक्त आणि आरोग्यासाठी उपयुक्त नागपूर मेट्रो शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान महामेट्रोतर्फे सुधाकर उराडे, महेश गुप्ता आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Germanyजर्मनीMayorमहापौरMetroमेट्रो