शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

मेयोचे रुग्ण अर्धपोटी

By admin | Updated: July 9, 2016 03:02 IST

नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आहार दिला जात असल्याने मेयोच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सकस आहारावरही प्रश्नचिन्ह : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरतो रुग्णांचा आहारनागपूर : नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आहार दिला जात असल्याने मेयोच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. मेयोच्या पाकगृहात कर्मचाऱ्यांची तोकडी सोय व अद्ययावत यंत्रणा नसल्याने हा फटका बसत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. आजार लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. सध्याच्या स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो)३५० वर रुग्णांना सकाळच्या नाश्तासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा मेनू ठरलेला आहे. परंतु तटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नसल्याचे वास्तव आहे. भाजीच्या नावाखाली दुधी भोपळ्याची व लाल भोपळ्याची रस्सेदार भाजी दिली जात आहे. नावाला वरण असले तरी त्यात केवळ पाणीच राहत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. याला पोषक आहार म्हणावे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मेयोसारखीच मेडिकलच्याही पाकगृहाची स्थिती होती. येथेही कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांचा आहार अडचणीत आला होता. शासनही याकडे लक्ष देत नव्हते. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘रोटी मेकर’ यंत्र विकत घेतल्याने तूर्तासतरी यातून मार्ग काढण्यात त्यांना यश आले आहे. असेच यंत्र मेयोच्या पाकगृहात उपलब्ध झाल्यास मदत होऊ शकेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)चव नाहीच, ‘कॅलरीज’ तर दूरचशासनाने मेयोच्या पाकगृहाला चवीचे आणि कॅलरीजचे नियम घालून दिले आहेत. मधुमेह, क्षयरोगाचे रु ग्ण, जळालेले रुग्ण, लहान मुले आणि गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या निर्देशानुसार हाय कॅलरीज फूड देण्याचा आणि हा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्याचा नियम आहे. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा जोवर मिळत नाही तोवर पाकगृहात तयार झालेला कुठलाही पदार्थ रु ग्णांना वितरित करता येत नाही. असे असतानाही, पोषक नसलेल्या मोजक्याच आहारावर ‘समाधानकारक’ शेरा दिला जात आहे. विशेष म्हणजे, आहराला चव राहत नाही ‘कॅलरीज’ तर दूरची गोष्ट असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.