शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 01:03 IST

दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देअडीच तास काम बंद आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, १०.३० वाजूनही कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लिपीक आले नसल्याने, त्याचा संतापही परिचारिकांनी व्यक्त केला.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), रुग्णालयाचा कणा म्हणून परिचरिकांकडे पाहिले जाते.मागील दीड वर्षांपासून परिचारिकांच्या वेतनांचा प्रश्न टोलवला जात होता. सेवार्थ सुरू झाल्यानंतर १ तारखेला वेतन होईल, असे आश्वासन दिले जात होते, परंतु मागील तीन वर्षात एकदाही १ तारखेला वेतन झाले नाही. दहा ते बारा दिवस उलटून गेल्यानंतर वेतन मिळायचे मात्र डिसेंबर २०१९ चे वेतन २६ जानेवारी उलटून गेल्यानंतरही मेयो प्रशासनाने परिचारिकांच्या वेतनासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. अखेर संतप्त झालेल्या परिचारिकांनी वॉर्डात नर्सिग केअर सोडून वेतनासाठी आंदोलने करीत बसायचे का, असा सवाल करीत अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या कार्यप्रणालीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. परिचारिकांनी अचानक पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे अनेक वॉर्डात परिचारिकांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. दोन ते अडीच तास रुग्णसेवेचे गणितं बिघडले. रुग्णांना औषधं देण्यापासून तर रुग्णांच्या नोंदीही रखडल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले असून यापूर्वी दर दिवसाला येथील लिपिकांकडे वेतनासंदर्भात विचारपूस करण्यात येत होती. परंतु वेतन न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला, परंतु दखल घेतली नसल्यामुळे मेयोतील परिचारिकांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. मेयोतील काही ठिकाणच्या सेवा अडीच तास कोलमडल्या.प्रशासकीय अधिकारीच नसल्याचा परिणाम मेयोमध्ये कायमस्वरुपी प्रशासकीय अधिकाऱ्याची खुर्ची रिकामी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांपासून तर परिचारिकांच्या, डॉक्टरांच्या वेतनाचा प्रश्न उभा ठाकतो. दर महिन्याला वेळेवर वेतन होईल, असे आश्वासन दिले जाते. परंतु वेळेवर वेतन होत नाही. यामुळे परिचारिकांनी मेट्रन यांना रीतसर अर्ज देऊन अधिष्ठाता डॉ. केवलिया यांच्या कार्यालयावर धडक दिली.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)agitationआंदोलन