शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे मेयो होत आहे चकाचक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:15 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अनेक वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती, याला गंभीरतेने घेत रुग्णालय प्रशासनाने ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० कर्मचारी उपलब्ध करून दिल्याने रुग्णालय चकाचक होत आहे.

ठळक मुद्दे२२० कंत्राटी कर्मचारी झाले उपलब्ध : सफाईवर वर्षाला ३.८६ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अनेक वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती, याला गंभीरतेने घेत रुग्णालय प्रशासनाने ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० कर्मचारी उपलब्ध करून दिल्याने रुग्णालय चकाचक होत आहे.केवळ विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील सामान्य जनतेला मेयो रुग्णालयाचा मोठा आधार वाटतो. परंतु येथील विखुरलेल्या इमारती व नव्याने सुरू झालेल्या २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्समुळे सोयी पुरविणे रुग्णालय प्रशासनाला अवघड जात होते. विशेषत: सफाईला घेऊन मेयो प्रशासन नेहमीच अडचणीत येत होते. रुग्णालयाकडे केवळ ८० सफाई कर्मचारी त्यातही अनेकांचे वय ५० वर गेल्याने तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांच्याकडून कामे करून घेणे शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून काही महिन्यांपूर्वी सफाई कामांचे कंत्राट एका कंपनीला दिले. या कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांवर सफाईची जबाबदारी देण्यात आली. मात्र, कंपनीच्या विरोधात काही सफाई कर्मचारी गेल्याने व यातूनच काम बंद आंदोलन झाल्याने रुग्णालय अडचणीत आले होते. प्रशासनाने याला गंभीरतेने घेत हे कंत्राटच संपुष्टात आणले. १० मे पासून ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० कर्मचारी उपलब्ध करून दिले. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स, सर्व अतिदक्षता विभाग व कॅज्युअल्टीची जबाबदारी सोपविली आहे आहे. गेल्या दोन आठवड्यातच या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावल्याने रुग्णालयाची सफाई डोळ्यात भरत आहे. मेयो प्रशासनाचे या सफाईवर ३.८६ कोटी रुपये वर्षाला खर्च होणार आहे.‘आरएमओ’ वसतिगृह हस्तांतरितमेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (आरएमओ) वसतिगृहाला घेऊन त्रुटी काढत होती. गेल्या दोन वर्षांपासून या वसतिगृहाचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी या इमारतीचे मेयो रुग्णालयाकडे हस्तांतरण झाले. यामुळे जुने वसतिगृहाचे ९६ व नवीन वसतिगृहाचे ९८ मिळून १९४ खोल्या उपलब्ध झाल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निवासाचा मोठा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर