शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

मेयो, मेडिकलची ओपीडी अर्ध्यावर आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 8:47 PM

जनता कर्फ्यूचा परिणाम मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येवर झाला. मेयो, मेडिकलमध्ये इतरवेळी एक ते दीड हजार रुग्णसंख्या राहत असताना शनिवारी ही संख्या ५००च्या आत होती.

ठळक मुद्देरुग्णसंख्येवरही परिणाम : खासगीमध्येही रुग्णसंख्या रोडावली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूचा परिणाम मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येवर झाला. मेयो, मेडिकलमध्ये इतरवेळी एक ते दीड हजार रुग्णसंख्या राहत असताना शनिवारी ही संख्या ५००च्या आत होती. तर मोठ्या खासगी हॉस्पिटलमधील रोजची ओपीडी २०० ते ३०० वरून ५० ते १०० वर आली. जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचा प्रभाव रुग्णसंख्येवरही दिसून आला. विशेषत: मेयो, मेडिकलच्या ओपीडीमध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत नेहमीच असणारी रुग्णांची गर्दी आज नव्हती. मेडिकलमध्ये आज ४८२ रुग्णांची नोंद झाली. यातील सर्वाधिक रुग्ण, १६७ रुग्ण मेडिसीन विभागातील होते. त्यानंतर जनरल सर्जरीत ५४, त्वचा रोग विभागात ४५, स्त्री रोग व प्रसूती विभागात ३७, नेत्ररोग विभागात ३२, ईएनटी विभागात २९, अस्थिव्यंगोपचार विभागात २८ यासह इतरही विभागात १५च्या खाली रुग्णांची उपस्थिती होती. असेच काहीसे चित्र मेयोतील होते. येथील ओपीडीत २६६ रुग्णांनी उपचार घेतला. खासगी हॉस्पिटलमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत फारशी गर्दी नव्हती. गंभीर रुग्णच केवळ उपचारासाठी आले, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय