शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मेयो, मेडिकलमध्ये अ‍ॅण्टीरेबिज लसच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:27 IST

उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अ‍ॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसह इतरही रुग्णांना रिकामे परतावे लागते. महानगरपालिकेच्या दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. परंतु सुटीच्या दिवशी व रुग्णालयीन वेळेतच लस मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देवर्षाला आठ हजार लोकांना चावतात श्वान : गरीब रुग्ण अडचणीत : मनपाकडूनही रुग्णांची बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अ‍ॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसह इतरही रुग्णांना रिकामे परतावे लागते. महानगरपालिकेच्या दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. परंतु सुटीच्या दिवशी व रुग्णालयीन वेळेतच लस मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ ‘बीपीएल’च्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे धोरण आहे. परंतु गेल्या महिन्यापासून या दोन्ही रुग्णालयात अ‍ॅन्टीरेबिज लसच नाही. रुग्णांना बाहेर विकत आणण्यास किंवा महानगरपालिकेच्या दवाखाान्यात जाण्यास सांगितले जाते. गेल्या आठवड्यात एका महिलेला माकड चावल्याने ती मेडिकलमध्ये गेली, मात्र तिला खाली हात परतावे लागले.महिन्याकाठी ५०० लसींची गरजमेयो व मेडिकलमध्ये आठवड्याभरात सुमारे ७० ते ८० वर अ‍ॅन्टीरेबिज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अ‍ॅन्टीरेबिज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. मात्र मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. परिणामी, तुटवडा निर्माण होतो. यातच स्थानिक खरेदीवर मर्यादा आल्याने या दोन्ही रुग्णालयात लस नसल्याचे सांगण्यात येते.‘हाफकिन’कडून लसीची प्रतीक्षावैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मेडिकलला औषधे पुरवठा करण्याची जबाबदारी ‘हाफकिन कार्पाेरेशन कंपनी’कडे देण्यात आली आहे. परंतु या कंपनीकडून अद्यापही अ‍ॅन्टीरेबिज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.सुटीच्या दिवशी करावी लागते पदरमोडलसीच्या तुटवडा पडल्याने कुत्रा, माकड किंवा मांजर चावलेल्यांना महापालिकेच्या इस्पितळांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. मनपाच्या सदर आणि महाल येथील इस्पितळांमध्ये अ‍ॅण्टीरेबीजची लस आहे. परंतु रविवार व इतर सुटींच्या दिवशी हे दोन्ही इस्पितळे बंद राहत असल्याने रुग्णांची बोळवण होते. इतर दिवशीही ठराविक वेळेतच ही लस मिळते. यामुळे गरिबांनी करावे काय, हा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdogकुत्रा