शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकलमध्ये वाढले पक्षाघाताचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:41 IST

विदर्भात थंडीमध्ये वाढ होताच मेयो, मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सकाळच्या वेळी येणाऱ्या या रुग्णांची संख्या मोठी आहे.

ठळक मुद्देरोज येत आहेत तीन-चार रुग्ण : ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळणे कठीण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चौथे मोठे कारण ठरले आहे. विदर्भात थंडीमध्ये वाढ होताच मेयो, मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सकाळच्या वेळी येणाऱ्या या रुग्णांची संख्या मोठी आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयात ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीच्या उपचाराची उणीव असल्याचेही समोर आले आहे.शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसीस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असे म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे हा आजार होतो. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोरा जातो. तात्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) इतर दिवसात रोज एक-दोन पक्षाघाताचे रुग्ण येतात. अलिकडे थंडी वाढताच तीन-चार रुग्ण येत आहेत. डॉक्टरांच्या मते, थंडीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या अखडतात. यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. हृदयावर ताण येऊन पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. याला इतरही घटक कारणीभूत ठरतात. परिणामी,सकाळच्यावेळेत पक्षाघाताच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.‘गोल्डन अवर’चे नियोजनच नाहीपक्षाघाताची लक्षणे दिसताच चार ते पाच तासात उपचार मिळाल्यास या आजाराचे घातक परिणाम कमी करता येतात. यामुळे रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. परंतु चोर पावलांनी येणारा हा आजार रात्री झोपेत आल्यास सकाळी रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच उशीर होतो. खासगी इस्पितळात या आजाराला घेऊन वेगळे ‘युनिट’ किंवा कार्यपद्धती असते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये तसे नियोजन नसल्याचे चित्र आहे. विशेषत: रुग्णालयात आलेला रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असेल तर त्याच्या उपचाराचा खर्च मंजूर व्हायलाच ४८ तासांचा वेळ लागतो. लाभार्थी रुग्ण नसेल तर तातडीने सिटी स्कॅन, चार तासाच्या आत दिले जाणारे सुमारे ४५ हजार रुपयांचे ‘टीपीए’ इंजेक्शन व इतरही उपचाराची सोय उपलब्ध असतेच असे नाही.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Healthआरोग्य