शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेयो इस्पितळात बोगस नर्स : बाळ पळविण्याचा प्रयत्नही फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:34 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन्ही घटनेमुळे रुग्णालय प्रशासन हादरून गेले आहे. दोन्ही महिलांना तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ठळक मुद्देतहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन्ही घटनेमुळे रुग्णालय प्रशासन हादरून गेले आहे. दोन्ही महिलांना तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. मेयोच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर एका अनोळखी महिलेने या बाळाला सुरुवातीला कुशीत घेत तिच्या नातेवाईकांशी जवळीक साधली. नातेवाईकांचे लक्ष विचलित होताच तिने बाळाला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका महिला सुरक्षा रक्षकाचे तिच्यावर लक्ष होते. पळून जात असताना तिला पकडले. तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीत ती मानसिक रुग्ण असल्याचे पुढे आले.दुसरी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये परिचारिकेच्या वेशभूषेत असलेली एक महिला संशयित स्थितीत फिरत असताना आढळून आली. संशय वाढताच सुरक्षा रक्षकांनी तिला ओळखपत्राची मागणी केली. परंतु तिने पळून जाण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून आणले. तपासणी केली असता बॅगमध्ये स्टेथास्कोप, बीपी ऑपरेटर, रुग्णांच्या नावाच्या यादीचे रजिस्टर व दोन वेगवेगळ्या नावाचे ओळखपत्र आढळले. विचारपूस केली असता तिने याबाबत कुठलाच खुलासा केला नाही. सुरक्षा रक्षकांनी तिला तहसील पोलिसांच्या हवाली केले. तिच्याकडे असलेले रजिस्टर व खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा नंबर यावरून ते येथील रुग्णांना विशिष्ट खासगी रुग्णालयात पळवून नेण्याच्या रॅकेटमधील असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही घटनेमुळे मेयोच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.पास प्रणालीतून समाजविघातकांना दूर ठेवणे शक्यमेयोमध्ये भरती असलेल्या एका रुग्णासोबत एक किंवा जास्तीत जास्त दोन नातेवाईकांना राहण्यासाठी पास प्रणाली राबविली जाते. या घटनेमुळे ही प्रणाली आणखी गंभीरतेने राबविली जाणार आहे. या प्रणालीमुळेच समाजविघातकांपासून रुग्ण सुरक्षित राहतील. रुग्ण व नातेवाईकांनी यात सहकार्य करणे आवश्यक आहे. डॉ. सागर पांडेउपवैद्यकीय अधीक्षक, मेयो

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)