शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : अखेर ‘एमआरआय’ची खरेदी प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:37 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्राची खरेदी प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण झाली. पुढील १२ आठवड्यात हे यंत्र मेयोमध्ये स्थापन होणार आहे. या यंत्राच्या पाठोपाठ सिटी स्कॅन यंत्राची खरेदी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१२ आठवड्यात यंत्र होणार स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्राची खरेदी प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण झाली. पुढील १२ आठवड्यात हे यंत्र मेयोमध्ये स्थापन होणार आहे. या यंत्राच्या पाठोपाठ सिटी स्कॅन यंत्राची खरेदी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.मेयो प्रशासनाचे गेल्या आठ वर्षांपासून ‘एमआरआय’ व नव्या सिटी स्कॅनसाठी प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबर २०१६ रोजी ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद न झाल्याने हे दोन्ही यंत्र कागदावरच राहिले. ‘एमआरआय युनिट’ नसल्याच्या कारणाने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) मेयोतील ‘डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस’ची मान्यता काढून घेतली. शिवाय, ‘१६ स्लाईस सीटी स्कॅन’ यंत्र नसल्याची त्रुटी दाखवत ‘एमबीबीएस’च्या जागा धोक्यात आल्या होत्या. ‘एमसीआय’ने या संदर्भात मेयोला पत्रही पाठविले होते. हे दोन्ही यंत्र खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. यामुळे शिर्डीतील साईबाबा देवस्थान समितीने ३५ कोटी २८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हापकिन्स’ कंपनीकडे वळता केला. याच दरम्यान संस्थानने निधी देऊनही ‘एमआरआय’ स्थापन करण्यात आले नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. परिणामी, ३ जानेवारी २०१९ रोजी या निधीतून २५ कोटी इतक्या रकमेची यंत्रसामुग्री ‘टर्न-की’ तत्त्वावर खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली. ‘एमआरआय’ यंत्र कुठे स्थापन करावे याबाबतही गोंधळ उडाला होता. एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी बांधकामाला वेळ लागणार असल्याने तूर्तास वॉर्ड क्रमांक ४३ च्या तळमजल्यावर ‘एमआरआय युनिट’ विभाग सुरू करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिल्या. दुसरीकडे खरेदी प्रक्रियेला वेग आला. अखेर १८ एप्रिल रोजी १३ कोटी १० लाख ८६८ रुपयांच्या एमआरआय यंत्राच्या खरेदीचे आदेश निघाले. जर्मनी येथील सीमेन्स कंपनीचे हे यंत्र १२ आठवड्यांच्या आत मेयोत स्थापन होणार आहे. सूत्रानुसार, पुढील आठवड्यापर्यंत सिटी स्कॅनच्या खरेदीचे ऑर्डरही निघण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर