शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मेयो : अखेर बंद शस्त्रक्रिया गृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:40 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चार महत्त्वाच्या विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना बुरशी (फंगस) लागल्याने जून महिन्यापासून त्या बंद पडल्या होत्या.

ठळक मुद्देचार विभागाच्या शस्त्रक्रियागृहाला लागले होते फंगस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चार महत्त्वाच्या विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना बुरशी (फंगस) लागल्याने जून महिन्यापासून त्या बंद पडल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याला गंभीरतेने घेत बांधकाम विभागाला याविषयी जाब विचारल्याने यंत्रणा हलली. शस्त्रक्रियागृहात नवी यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे नुकतीच शल्यचिकित्सा व अस्थिव्यंगोपचार विभागाचे शस्त्रक्रियागृह सुरू झाले. मंगळवारपासून नेत्ररोग विभागाचे तर पुढील आठवड्यात ईएनटी विभागाचे शस्त्रक्रियागृह सुरू होणार आहे.मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये ऑर्थाेपेडीक, ईएनटी, सर्जरी व नेत्ररोग विभागाच्या प्रत्येक तीन-तीन शस्त्रक्रियागृह आहेत. जून महिन्यात ऑर्थाेपेडीक विभागाच्या शस्त्रक्रिया गृहाला फंगस लागले. याच दरम्यान नेत्ररोग, ईएनटी व सर्जरी विभागाच्या शस्त्रक्रियागृहालाही फंगस लागले. चारही विभागाच्या शस्त्रक्रिया प्रभावित झाल्याने रुग्ण अडचणीत आले होते. सर्जरी विभाग मॉड्युलर शस्त्रक्रिया गृहात शस्त्रक्रिया करीत असले तरी रोज दोन किरकोळ आणि गंभीर स्वरूपातील एकच शस्त्रक्रिया होत होत्या. ऑर्थाे विभागाने आपली तात्पुरती सोय केली होती. परंतु रुग्ण संख्येच्या तुलनेत मर्यादितच शस्त्रक्रिया होत होत्या. ईएनटी विभागाचेही असेच चित्र होते. नेत्ररोग विभागावर तर रुग्णांना डागा रुग्णालयात नेऊन तिथे शस्त्रक्रिया करावी लागत होती. शस्त्रक्रियागृहांना फंगस लागण्यामागे ‘एअर हॅण्डलिंग युनिट’ कारणीभूत होते.‘मॉश्चर’ तयार होऊन बुरशी लागत असल्याचे समोर आले होते. परंतु बांधकाम विभागाने सुरुवातीला त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरताच संचालक डॉ. लहाने यांनी १२ सप्टेंबर रोजी मेयोला भेट दिली. तातडीने शस्त्रक्रियागृह सुरू करण्याचा सूचनाही दिल्या. यामुळे यंत्रणा हलली. ‘हेफा फिल्टर’ ‘मायक्रो फिल्टर’ बदलवून नवी यंत्राणा बसविण्यात आली. यामुळे गेल्याच आठवड्यात सर्जरी व ऑर्थाेपेडीक विभागाचे शस्त्रक्रिया गृह सुरू झाले. पुढील आठवड्यात उर्वरित दोन विभागाचे शस्त्रक्रियागृह सुरू होणार आहे.मंगळवारपासून नेत्र शस्त्रक्रियांनाही सुरुवात‘फंगस’ लागल्याने नेत्रच्या शस्त्रक्रिया डागा रुग्णालयात केल्या जात होत्या. आता शस्त्रक्रियागृहातील समस्या दूर झाली आहे. मंगळवार २६ नोव्हेंबरपासून नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहातच सुरुवात होईल. ऑर्थाेपेडीक व सर्जरीच्या शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे, तर पुढील आठवड्यात ईएनटी विभागाची शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत.डॉ. रवी चव्हाणवैद्यकीय उपअधीक्षक, मेयो

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)