शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

मेयो : २५ कोटींच्या यंत्रसामुग्रीच्या खरेदीला मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:52 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनही या उपकरणांच्या खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच यातील २५ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देएमआरआय, सिटी स्कॅन, डीएसए येणारलोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनही या उपकरणांच्या खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच यातील २५ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.मेयो प्रशासनाचे गेल्या चार वर्षांपासून ‘एमआरआय’व नव्या सिटी स्कॅनसाठी प्रयत्न सुरू होते. नोव्हेंबर २०१६ रोजी ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद न झाल्याने हे दोन्ही यंत्र कागदावरच राहिली. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निकषाप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयात किमान ‘१६ स्लाईस सीटी स्कॅन’ यंत्र असणे आवश्यक असते. मेयोत कालबाह्य सिटी स्कॅन आहे तेही केवळ ‘ड्युअल स्लाईस’चे असल्याने एमबीबीएससह पदव्युत्तर जागा धोक्यात आल्या होत्या. ‘एमसीआय’ने या संदर्भात मेयोला पत्र पाठविले होते. हे यंत्र खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारांमुळे शिडीर्तील साईबाबा देवस्थान समितीने ३५ कोटी २८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. दोन महिन्यांपूर्वी मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हाफकिन्स’ कडे वळता केला. परंतु उपकरणांच्या खरेदी प्रस्तावाला मंत्रालयाची मंजुरीच मिळाली नसल्याने निधी असूनही रुग्ण उपकरणांपासून वंचित होते. निधीला प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी मोये प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात होता. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने १७ जूनच्या अंकात ‘३५ कोटी मिळूनही खरेदीच्या मंजुरीला ना’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. अखेर शासनाने नुकतेच ३५ कोटी २८ लाख रुपयांमधील पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांना मंजुरी दिली. तसे अध्यादेशही काढले.अशी होणार खरेदी

  •  १२ कोटींचे ‘३.० टेस्ला’ क्षमतेचे एमआरआय
  •  ७ कोटींचे ‘१२८ स्लाईस सीटी स्कॅन’
  •  ६ कोटींचे ‘डिजीटल सबट्रॅक्शन अ‍ॅन्जीओग्राफी’ (डीएसए) यंत्र खरेदी केली जाणार आहेत.
टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर